भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोहळा उत्साहात साजरा
किनवट/ प्रतिनिधी : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोहळा सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी, चाहते वर्ग यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी लहान मुलांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने विविध भीम गीतावर सामूहिक नृत्य सादर केले.
लोकशाहीचा उत्सव लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मी मतदान करणार अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते. यावर अनेक मतदारांनी स्वाक्षरी केली.
पुतळा परिसरात सामाजिक संघटनेच्या वतीने खिचडी व पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले.
यास प्रसंगी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. तसेच किनवट शहरात ठीक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी सार्वजनिक भीम उत्सव समितीच्या वतीने व विविध सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. या शुभप्रसंगी विविध पक्षाचे पदाधिकारी नेते व आंबेडकर प्रेमीजनता व अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम कानिंदे सर यांनी केले.