किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

*नांदेड अभिवक्ता संघाकडून राहुरी घटनेचा तीव्र निषेध* *वकील दाम्पत्याची खंडणीसाठी अपहरण करून निर्घृण हत्या निषेधार्थ काम बंद आंदोलन*

*नांदेड जिल्हा प्रतनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.२९.अहमदनगर जिल्हात राहुरी तालुक्यातील न्यायालयात काम करणारे ॲड. राजाराम आढाव व ॲड. मनिषा आढाव यांचा दि.२५ जानेवारी रोजी खंडणीसाठी अपहरण करुन निर्घृण न खुन करण्यात आला अशा प्रवृत्तीचा जाहीर निषेध म्हणून आज (दि.२९) नांदेड जिल्हा सत्र न्यायालयीन कामकाजात वकिलांनी सहभाग नोंदविला नाही.

यासंदर्भाने एक परिपत्रक नांदेड अभिवक्ता संघ यांच्या वतीने कढण्यात आले.परिपत्रकात नमुद केले आहे की,अहमदनगर जिल्हात राहुरी तालुक्यातील न्यायालयात काम करणारे ॲड.राजाराम जयवंतराव आढाव व ॲड.मनिषा राजाराम आढाव या दाम्पत्याचा खंडणीसाठी अपहरण करुन निर्घृण खुन करण्यात आला आहे. अशा अमानवी कृत्याचा व प्रवृत्तीचा जाहीर निषेध म्हणून आज रोजीच्या न्यायालयीन कामकाजात सहभाग न देता सर्व वकील सदस्यंहे अर्ज देऊन प्रकरण वाढवून घेत आहोत.असे परिपत्रक अभिवक्ता संघाचे
अध्यक्ष ॲड.आशिष दत्तात्रय गोधमगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवक्ता संघाचे सचिव ॲड.अमोल माधवराव वाघ यांनी काढून अभिवक्ता संघाच्या कुठल्याही सदस्यांनी २९ जानेवारी २०२४ चे न्यायालयीन कामकाजामध्ये सहभाग नोंदवू नये.आणि संबंधित न्यायालयात अर्ज सादर करून आपले कामकाज वाढून घेणे. असे परिपत्रक द्वारे आवाहन केले आहे. या आमानवी घटनेच्या निषेधार्थ नांदेड सत्र न्यायालयातील अभिवक्ता संघाचे अध्यक्ष.ॲड.आशिष दत्तात्रेय गोधमगावकर,
उपाध्यक्ष.ॲड.संजय खंडेराव वाकोडे,सचिव ॲड.अमोल माधवराव वाघ,सह.सचिव.ॲड.शेख रशीद पटेल,कोषाध्यक्ष.ॲड.मारुती गुंडप्पा बादलगावकर,विशिष्ट सहाय्यक.ॲड.जयपाल मधुकरराव ढवळे
सदस्यॲड.ज्योती रतनराव सूर्यवंशी,ॲड.मंगल शिवराज पाटील,ॲड.गोपाल किशनराव भोसले,ॲड.प्रीतीश हनुमंतराव टेकाळे,ॲड.यशोनिल उत्तमराव मोगल,ॲड.मो.अमीनोद्दिन सिद्दिकी,ॲड.वनिता सोपानराव बोईनवाड,ॲड.हनुमंत बालाजी नरंगळे,ॲड.पिराजी कोंडीबा कदम,ॲड.संदीप बाबुराव ढगे
ॲड.प्रभज्योत सिंग रामगडिया
ॲड.आकाश शंकर खाडे सर्व सदस्यांनी निषेध जाहीर करत न्यायालयीन कामकाज बंद करून.पाठींबा देत शासनाने लवकरात लवकर अभिवक्ता संरक्षक कायद्या बनून अमलात आणण्याची मागणी केली आहे.

197 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.