*एस.टी.समाजासाठी बिरसा मुंडा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करा – मंगेश कदम यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी* *अनुकंपाधारकांना हि तात्काळ सेवेत सामावून घ्या…*
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.२०.एस.टी.प्रवर्गातील समाजासाठी बिरसा मुंडा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी व राज्यातील अनुकंपाधारकांना तात्काळ सेवेत सामावून घेण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे शिवसेना एस.टी.एस.सी. ओबीसी विभागाचे जिल्हा प्रमुख मंगेश कदम यांनी केली आहे.
नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रात एस. टी. प्रवर्गातील समाज मोठया प्रमाणात असून ह्या समाजातील अनेक तरुण सुशिक्षित बेरोजगार आहेत.
तर अनेकजण मागासलेले आहेत.
त्यामुळे त्यांना उद्योगधंदे व व्यवसाय करण्यासाठी भांडवल व पैस्याची आवश्यकता असल्याने त्यांच्यासाठी स्वातंत्र्य बिरसा मुंडाआर्थिक विकास महामंडळ स्थापना करावी व राज्यातील अनुकंपा धारकांची संख्या मोठया प्रमाणात असून शासकीय सेवेत कर्तव्य बजावत असताना मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना घरातील कर्ताधर्ता गेल्याने आर्थिक झळ पोहचत असून त्यांच्या पाल्यासाठी विविध विभागात पदे रिक्त असतानाही शासकीय सेवेत सामावून घेतले जात नाही.जेष्ठतेनुसार नौकरीवर रुजू होई पर्यन्त त्यांची वयोमर्यादा संपुष्टात येत आहे.
त्यामुळे अनुकंपा धारकांसाठी असलेल्या जि.आर.मध्ये बदल करून नवीन जि.आर. काढण्यात यावा.व अनुकंपाधारकांना तात्काळ सेवेत सामावून घेण्यात यावे. अशी मागणी शिवसेना एस. सी. एस.टी.ओबीसी.विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.असून हे निवेदन मंत्रालय मुबंई येथे मुख्यमंत्री यांचे अवर सचिव प्रवीण पाटील यांना देण्यात आले.यावेळी कदम यांच्यासोबत बिलोलीचे माजी नगरसेवक महेंद गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे हे उपस्थित होते.