डाटा एन्ट्री ऑपरेटर चे बेमुदत काम बंद आंदोलन*. *NHM अंतर्गत समाविष्ट न केल्यास मंत्रालयासमोर करणार उपोषण..
नांदेड:-
एकीकडे महाराष्ट्र शासन म्हणते की रोजगार देऊन एक सक्षम भारत देश निर्माण करूया स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून लाखो नोकरी निर्माण करू या परंतु सध्या स्थिती यशस्वी अंतर्गत 2021 च्या कालावधीमध्ये नांदेड जिल्ह्यात नव्हे तर अख्या महाराष्ट्रात डाटा एन्ट्री ऑपरेटर भरण्यात आले यामध्ये तीन वर्षाचा करार असून देखील त्यांना दोन वर्षांमध्ये कामावरून जाण्यास सांगत आहेत
यामध्ये महाराष्ट्रातील साडेचार हजार डाटा ऑपरेटरवर बेरोजगारीची टांगती तलवार निर्माण झालेली आहे म्हणून साडेचार हजार विद्यार्थ्यांची फसवेगिरी करणारी कंपनी तिला हद्दपार करून नव्याने ट्रेनिंग घेतलेल्या साडेचार हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षकांना NRHM मध्ये समाविष्ट करून त्यांना प्रति महिना अठरा हजार वेतन देऊन ताबडतोब कामावर रुजू करून घेणे कोविड सारख्या महामारी मध्ये जीवाची परवा न करता या सर्वांनी काम केलेले आहे यांना असंच वाऱ्यावर जर सोडत असाल येणाऱ्या काळामध्ये उपोषणाला बसण्याची तयारी डाटा एन्ट्री ऑपरेटरने केलेली आहे तरी शासनाला विनंती आहे ताबडतोब यावर तोडगा काढावा आज जिल्हाधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन सर्व प्रशिक्षकांनी आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या तरी पुढील कारवाई लवकरात लवकर करावी असे विनंती नांदेड जिल्ह्यातील सर्व डाटा ऑपरेटर यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली निवेदनावर जिल्हा अध्यक्ष विशाल चव्हाण, उमेश जाधव, शिवणांदा वानखेडे, विठ्ठल पिटलेवाड, कामाजी शिंदे आदींची स्वाक्षरी आहे