किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

लेकीला आयुष्यभर बापाचे छत्र असायला हवे. बाप नसेल तर माहेरही पोरकं ठरल्याचा प्रत्येय अनेकांच्या जीवनात पहायला मिळाला. मुलगी नसेल तर बापाचे जीवनसुद्धा पोरकं ठरतं.- पत्रकार तथा अभिनेते दिग्दर्शक लक्ष्मीकांत मुंडे

किनवट/प्रतिनिधी- लेकीला आयुष्यभर बापाचे छत्र असायला हवे. बाप नसेल तर माहेरही पोरकं ठरल्याचा प्रत्येय अनेकांच्या जीवनात पहायला मिळाला. मुलगी नसेल तर बापाचे जीवनसुद्धा पोरकं ठरतं. असे उद्गार पत्रकार तथा अभिनेते दिग्दर्शक लक्ष्मीकांत यांच्या कन्येच्या आज पार पडलेल्या वाढदिवसाच्या औचित्यावर आज (३१ आॅक्टोबर) त्यांनी काढले. प्रधानसांगवी येथिल जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वही,पेन व खाऊ वाटप करुन साजरा करण्यात आला.गेल्या अनेक वर्षापासुन स्वताचा व मुलांचा वाढदिवस शाळेतील मुलांना शालेय साहीत्य वाटप करुन व खाऊ देवुन साजरा करण्यात मुंडे कुटुंबीय समाधान व आनंद मानत आले आहे. याहीवर्षी हर्षोल्हासात वाढदिवस साजरा केला हे विशेष.
यावेळी कल्याणीचे आजोबा माजी पैहलवान नामदेवराव मुंडे यांच्यासह ईश्वर मुंडे,मुख्याध्यपक आढागळे सर,सहशिक्षक राठोड सर,म्याकलवार मॅडम,स्वामी मॅडम,अंगणवाडीच्या केंद्रे ताई व सेवक सुभाष कट्टाजीवार हे उपस्थीत होते.आभार व्यक्त करताना लक्ष्मीकांत मुंडे हे भाऊक होऊन म्हणाले की, प्रत्येक बापाला एक लेक असावी आणि प्रत्येक लेकीला जिवनभर बापाचे छत्र असावे. कारण जर बाप नसेल तर माहेर सुद्धा अगदी परक वाटतं.

93 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.