सामाजिक न्याय नांदेड जिल्हा शहर महासचिव पदी मारोती शिकारे यांची निवड
नांदेड:- ( प्रतिनिधी ) नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभाग कार्यकर्त्यांची आज कॉंग्रेस कमिटी कार्यालयात बैठक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थतीत घेण्यात आली. या बैठकीत सामाजिक न्याय विभागातील विविध पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. गोविंद नगर नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा सा. नंदगिरीचा कानोसा चे मुख्य संपादक मारोती शिकारे यांची नांदेड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या शहर महासचिव पदी निवड करण्यात आली.
निवडीचे पत्र माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी माजी मंत्री डी. पी. सावंत, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अमर राजूरकर, जिल्हा कॉंग्रेस कमिटचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, ऍड. सुरेंद्र घोडजकर, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रफुल्ल सावंत, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ. गंगाधर सोनकांबळे, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. मनोहर पवार, सामाजिक न्याय विभागाचे नांदेड शहर नुतन जिल्हाध्यक्ष प्रवीण कुपटीकर, नांदेड शहर कॉंग्रेस कमिटीचे चिटणीस सुभाष काटकांबळे, अर्धापूर येथील नगरसेवक सोनाजी सरोदे आदींची उपस्थिती होती. मारोती शिकारे यांच्या नियुक्तीबद्दल पुरोगामी पत्रकार संघ नांदेड जिल्हा अध्यक्ष शंकरसिंह ठाकुर, मराठवाडा कार्याध्यक्ष प्रकाश कोल्हे, नांदेड जिल्हा संघटक संजय राक्षसे, न्युज लोकजागृती चे मुख्य संपादक रविंद्र नरवाडे, सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर बंडेवार, शिवाजी नुरुंदे, सा. नंदगिरीचा कानोसा चे सहसंपादक सुहास जोंधळे, पत्रकार मोहम्मद नसिर आदींनी अभिनंदन केले आहेे.