शहरातील गावठाण हद्दीच्या च्या प्रश्नावर राष्ट्रवादी गटनेते जाहिरोद्दीन खान 4 जानेवारी 2022 पासून आमरण उपोषण करणार
किनवट/प्रतिनिधी: शहरातील गावठाण हद्दीच्या च्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर परिषद किनवट चे गटनेते जाहिरोद्दीन खान हे 4 जानेवारी 2022 पासून आमरण उपोषण करणार आहेत.नगर परिषद किनवट च्या ढिसाळ कारभारामुळे शहरातील मालमत्ता धारकांना स्वतः च्या मालमत्ता चे खरेदी विक्री व्यवहार करता येत नसल्याने याबाबत योग्य ती विचारणा गटनेते जाहिरोद्दीन खान याच्या मार्फत करण्याचा प्रयत्न केले असता त्यांना नगर परिषद किनवट मधून व नगराध्यक्ष यांच्याकडून योग्य माहिती प्राप्त होत नसल्याने त्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे.असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
535 Views