किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

राज्य उत्पादन शुल्काची हातभट्टी मुक्त गाव अभियान अंतर्गत मौजे शनिवारपेठ ता.किनवट येथे मार्गदर्शन सत्र.

किनवट (तालुका प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्काची हातभट्टी मुक्त गाव अभियान अंतर्गत मौजे शनिवारपेठ ता.किनवट येथे मार्गदर्शन सत्र घेण्यात आले होते. यावेळी गावातील महिला पुरुष यांनी स्व्यंस्पूर्थीने सहभाग नोंदवत कार्यक्रमातील अधिकाऱ्यांचे मनोबल वाढविलेले दिसले. मागील काळात मा.आयुक्त राज्य उत्पादन शुल्क मुंबई श्री. डॉ. विजयकुमार सुर्यवंशी (भाप्रसे) तसेस विभागीय उप-आयुक्त राज्य उत्पादन शुल्क नांदेड श्रीमती उषा वर्मा मॅडम यांच्या मार्गदर्शनात तसेच मा. अधिक्षक राज्‍य उत्पादन शुल्क नांदेड श्री. अ.अ.कानडे साहेब यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क किनवट विभागाचे निरीक्षक श्री. ए.एम.शेख यांनी किनवट तालुक्यातील शनिवारपेठ गावात हातभट्टी निर्मिती व विक्री केंद्रावर मागील मे महिन्यात वारंवार गुन्हे उघडकीस आणले व आरोपीं विरूध्द कायदेशिर कार्यवाही करण्यात आली आहे. सदर कालावधीत एकुण 07 गुन्हे नोंदविण्यात आले असुन हातभट्टी दारू, गुळ मिश्रीत रसायण व इतर साहित्य असा एकुण 40,000/- किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
मौ. शनिवारपेठ येथील प्रतिष्ठित नागरीक, सरपंच, सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या समवेत निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क किनवट व पोलीस निरीक्षक श्री. डी.ए.बोरसे यांनी बैठक घेतली असुन हातभट्टी मुक्त गाव हि संकल्पना मांडली व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम मधील तरतुदी सांगितल्या. या नुसार गावकरी आणि सरपंच श्रीमती वस्तलाबाई खंडू किरवले, ग्रामविकास अधिकारी श्री आर.जी. कागणे यांनी हातभट्टी मुक्त गाव करण्या बाबत व सहकार्य करण्याबाबत आश्वासन दिले.
मार्गदर्शन सत्रास गावकरी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, तंटामूक्ती अध्यक्ष श्री. प्रकाश गब्बा राठोड हे हजर होते. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क किनवट श्री. ए.एम. शेख यांनी हातभट्टी मुक्त गाव ही संकल्पना मांडली व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम मधील तरतुदी सांगितल्या यानुसार गावकरी व सरपंच, उपसरपंच यांनी हातभट्टी मुक्त गाव करण्याबाबत व सहकार्य करण्याबाबत आश्वासन दिले. मार्गदर्शन सत्रास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक श्री. आर.पी.पवार, तसेच स.दु.नि. मो.रफि, जवान ए.आर. जाधव, श्री.एन.पी.भोकरे व वाहन चालक श्री.डी.के.जाधव हे हजर होते.

192 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.