किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

बाळुभाऊ डी.लोंढे यांनी दिला सर्वं पदाचा राजीनामा

नांदेड जिल्हा प्रतिनिधी संजीवकुमार गायकवाड:
भारतीय जनता पार्टीच्या मराठवाडा पश्चिम विभाग सहसंयोजक पदी असलेले बाळुभाऊ डी लोंढे यांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे व पुढील निर्णय लवकरच घेणार असल्याचे सांगितले.
ते बोलतांना म्हणाले की,भारतीय जनता पार्टीच्या मराठवाडा पश्चिम विभाग सहसंयोजक पदावर आजपर्यंत काम करत होतो, जर माझ्या सारख्या मराठवाड्यावर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे साधे साधे काम होत नसतील तर तालुका, जिल्हा लेवलच्या पदाधिकाऱ्यांचे काम कसे होतील, आपण जीव तोडुन शिव्या खाऊन पक्षांचं काम करतो पण त्याचाच गैरफायदा घेऊन आपला वापर करुन काही पक्षातील पदाधिकारी स्वतः चे काम करत आहेत, आणि तुमच्या माझ्या सारखे कार्यकर्ते काम करुन मरत आहेत, केंद्रांत भाजपाची सरकार आहे, महाराष्ट्रात भाजपाचीच सरकार आहे, तरी पण आपलेच काम होत नसतील तर समान्य जनतेचे काम आपण कुणाच्या भरवशावर करायचे, म्हणूनच पक्षातील काही पदाधिकाऱ्याच्यां कार्याला कंटाळून मी स्वतःहुन राजीनामा देत आहे, बाकी पक्ष येतील-जातील परंतु आपले मिञत्वाचे नाते असेच..टिकुन रहावे, मी आजवर एका राष्ट्रीय पक्षाचा पदाधिकारी होतो आज सामान्य कार्यकर्ता आहे, म्हणून आपल्या मिञत्वामध्ये दुरावा येऊ नये, ज्याच्या त्याच्या पक्षाच्या विचाराप्रमाने काम करत असतांना वैचारिक वाद असावा पण प्रसनल वाद विवाद करुन घेऊ नका कारण करोडोची संपती असणारे नेते रातो-रात पक्ष बदलत असतात, त्याच्यांपुढे आपण तर काहीच नाही, जर माझी तुम्हाला किंवा तुमची मला कोणतीही कधीही मदत लागल्यास एकमेकांना सहकार्य करु व पुढील निर्णय लवकरच घेणार आहे…धन्यवाद
भारतीय जनता पक्षांतील सर्वांना माझा शेवटचा जय श्रीराम..

47 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.