किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

किनवट पो.स्टे. हद्दीतील नागरिकांना जाहीर आवाहन

KTN महाराष्ट्र/किनवट:
किनवट पो.स्टे. हद्दीतील नागरिकांना किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी किनवट पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन
करण्यात आले आहे. की,सध्या शाळांना लागलेल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या, धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभ वगैरे कारणांमुळे बाहेरगावी जाताना अथवा घर सोडताना घरात चोरी अथवा घरफोडी होऊ नये यासाठी खालील प्रमाणे काळजी घ्यावी.

दीपक बोरसे
पोलीस निरीक्षक
पोलीस स्टेशन किनवट
मो.क्र. 9309737394
——-00——

👉 आपल्या घरी असलेले मौल्यवान दागिने व रोख रक्कम चुकूनही घरातील अलमारी, कपाट, तिजोरी यासारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ठिकाणी ठेवू नये कारण चोरी करणारे अथवा घरफोडी करणारे प्रथम याच ठिकाणी मुद्देमालाचा शोध घेतात अथवा फोडतात.

👉आपण बाहेरगावी जात असल्याची माहिती आपले विश्वासू शेजारीपाजारी तसेच विश्वासू नातेवाईक यांना द्यावी. अधून मधून घर चेक करण्यास, लक्ष ठेवण्यास सांगावे.

👉बाहेरगावी जाताना घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात.घराचे बाहेरील व आतील लाईट चालू राहील याची काळजी घ्यावी. जेणेकरून घरात घुसलेला व्यक्ती बाहेरच्यांना सहज ओळखू येईल.

👉 ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली अथवा बरी आहे अशा नागरिकांनी आपल्या घरासमोर अथवा दुकानासमोर, ज्यात सार्वजनिक रस्ता कव्हर होईल असे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे तसेच आपण सीसीटीव्ही च्या कक्षेत आहात असे सूचनाफलक सुद्धा लावावे. आपला सीसीटीव्ही कॅमेरा चालू असो अथवा बंद असो परंतु सदर बाबीचा खूप चांगला परिणाम होत असतो.

👉 घरामध्ये पती-पत्नी अथवा घरातील सर्वजण नोकरी व्यवसायात असल्यास व त्यांचे रोजच्या वेळेत कामावर जाण्याचे रुटीन असल्यास अशांनी दिवसा सुद्धा दक्ष व जागरूक असणे गरजेचे आहे.

👉 छोट्या छोट्या व्यापारीपेठा अथवा एरियासाठी सार्वजनिक रित्या रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी एखादा वॉचमन ठेवल्यास ठराविक एरियाची सुरक्षितता चांगल्या पद्धतीने होते याचाही आपण आवर्जून विचार करावा.

👉आज काल बाजारात सुरक्षा संबंधी वेगवेगळ्या प्रकारचे अत्याधुनिक सॉफ्टवेअर, यंत्र आलेले आहेत ,जे नेट द्वारे आपल्या मोबाईलशी कनेक्ट करता येतात. आपल्या घराच्या अथवा दुकानाच्या सुरक्षेसाठी त्याचाही विचार करावा .

👉 संकटाच्या वेळी अथवा अडचणीच्या वेळी आपण 112 हा क्रमांक डायल करून तात्काळ पोलीस मदत मिळवू शकतात. शहरात आपणास तात्काळ मदत पोहोचेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

👉आपण आम्हास संकटाचे वेळी कधीपण आणि कोणत्याही वेळी, रात्री अपरात्री निसंकोचपणे कॉल करू शकतात. आपणास वेळेत मदत मिळेल याची आम्ही खात्री देतो.
👉काळजी घ्या ,सुरक्षित रहा, नुकसान टाळा

272 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.