किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

आधुनिक युगासोबत स्पर्धा करण्यासाठी विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान गरजेचे..संतबाबा ज्योतिंदरसिंघजी

*श्री दशमेशज्योत इंग्लिश मीडियम शाळेत संगणक लॅबचे उद्धघाटन*

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.7.आजची शिक्षण प्रणाली आणि अभ्यासशैलीत संगणक आणि इतर गैजट महत्वाची भूमिका पार पाडित आहेत तेव्हा आधुनिक युगाशी स्पर्धा करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यास संगणक वापरता येणे गरजेचे आहे.

म्हणून श्री दशमेशज्योत इंग्लिश मीडियम शाळेत 50 विद्यार्थी क्षमता असलेल्या डिजिटल कंप्यूटर लॅबची सुरुवात करण्यात आली असल्याचे प्रतिपादन गुरुद्वारा सचखंडचे मीत जत्थेदार संतबाबा ज्योतिंदरसिंघजी यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केले.श्री दशमेज्योत इंग्लिश मीडियम शाळेत आधुनिक प्रणालीच्या संगणक लॅबच्या उद्धघाटन प्रसंगी ते बोलत होते.

शनिवार,दि. 8 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता गुरुद्वारा श्री लंगरसाहिबचे मुखी संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले यांच्या पावन हस्ते आधुनिक तंत्रज्ञान संगणक लॅबचे उदघाटन पार पडलें.यावेळी कार्यक्रमात गुरुद्वाराचे माजी मीत ग्रंथी ज्ञानी अवतारसिंघजी शीतल,गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव स. सुरिंदरसिंघ मेंबर,माजी नगरसेवक स.सुरजीतसिंघ गिरनीवाले,कामठा गावाचे उपसरपंच व गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव स.रणजीतसिंघ कामठेकर,माजी सह आयुक्त मनपा स.जगजीतसिंघ चिरागिया,नवज्योत फाउंडेशनचे अध्यक्ष स.नौनिहालसिंघ जहागीरदार,सामाजिक कार्यकर्ता डॉ हरदीपसिंघ यांची मुख्य उपस्थिती होती.

तसेच माजी उपमहापौर स. सरजीतसिंघ गिल,स. सुखविंदरसिंघ हुंदल,स. देवेंद्रसिंघ विष्णुपुरीकर,एडवोकेट स्वर्णसिंघ कामठेकर,स. देवेंद्रसिंघ मोटरावाले,स. सुरजीतसिंघ तबेलवाले,स. रणजीतसिंघ चिरागिया,स. ठानसिंघ बुंगाई,स.हरजीतसिंघ कडेवाले,प्राचार्य गुरबचनसिंघ सिलेदार,सतपालसिंघ गिल, जसबीरसिंघ सिद्धू, सज्जनसिंघ सिद्धू, हरमिंदरसिंघ मान,स. राजिंदरसिंघ चावला,स. सुरजीतसिंघ खालसा,स. मनदीपसिंघ कम्युनिटी ऑफिसर सह मोठ्या संख्येत प्रतिष्ठित नागरिकांची व पत्रकारांची उपस्थिती होती.

आपल्या मनोगतात संतबाबा ज्योतिंदरसिंघ पुढे म्हणाले,दहा वर्षांपूर्वी श्री दशमेश ज्योत इंग्लिश मीडियम स्कूल शाळेची सुरुवात करण्यात आली होती. आजघडीला शाळेत एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे.

शाळेत गरीब व गरजूं विद्यार्थ्यांना मदत करण्यात येते तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी येथे तयार करण्यात येते.संगणक लॅबचे उद्धघाटन केल्यानंतर संतबाबा बलविंदरसिंघ कारसेवावाले यांनी आधुनिक कंप्यूटर लॅब साठी सहा लक्ष 51 हजार रुपये देण्याची घोषणा केली.
कार्यक्रमात सिख युवक सेवा संघाच्या सर्वसदस्यांचे सत्कार करण्यात आले.मागील 35 वर्षापासून सिख युवक सेवा संघ कार्यरत असून शीख समाजात सामूहिक विवाह मेळावा सुरु करण्याचे उपक्रम त्यांच्या तर्फे करण्यात आले होते.

रणजीतसिंघ कामठेकर पहिले अध्यक्ष होते व त्यांनी सन 1988 मध्ये शीख समाजाचा पहिला मेळावा सुरु केला होता त्याची आठवण येथे जपण्यात आली.उदघाटनानंतर शाळेतील विद्यार्थीयांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रस्तुतीकरण केले.सांस्कृतिक कार्यक्रमानांतर पाहुणे, पालकगण, विद्यार्थ्यांसाठी भव्य लंगर-प्रसाद कार्यक्रम करण्यात आले.

240 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.