पत्नीसह चिमुकल्यास ठार मारणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा | मुखेड जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.3.जिल्यातील मुखेड तालुक्यात मधील
पत्नी व एक वर्षाच्या चिमुकल्या मुलास सासरवाडीमधून येवून दोघांना ठार करणाया नराधम बापास मुखेड येथील जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही घटना मुखेड तालुक्यातील मंडलापुर येथे घडली होती.
मुखेड तालुक्यातील मंडलापुर येथील वैशाली वय अंदाजे २५ वर्ष हीचा विवाह दोन वर्षापूर्वी येडुर तालुका देगलुर येथील तानाजी किशन भुताळे वय ३० वर्ष याच्याशी झाला होता.काही महिने संसार सुरुळीत झाल्यानंतर आदेश नावाचा गोंडस मुलगा झाला.अचानक गाडी घेण्यासाठी माहेरहुन पैसे घेवून ये म्हणून आरोपी तानाजी यांनी पत्नी व मुलास शारीरिक मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. यामुळे दोन्ही परिवारातील मंडळीने मध्यस्थी करून २ लाख ४० हजार रुपये जावयास दिले. यानंतर काही कालावधी नंतर पुन्हा पती पत्नी मध्ये वाद होवू लागला. या त्रासास कंटाळून वैशाली व लहान चिमुकला आदेश माहेरी मांडलापुर येथे राहण्यासाठी आले.
दोन महिने पत्नी व मुलगा माहेरी रागातून सासरवाडी मंडलापूर येथें येवून सासरवाडी येथील लोक शेत कामासाठी शेतात गेले असता. पत्नीवर चाकूने सपासप वार करून पत्नी वैशाली व मुलगा आदेश यास जागीच ठार मारले.यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीस ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना २७ मे २०२० रोजी मंडलापुर येथे सकाळी १० वाजता घडली.याप्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात रमाबाई मारोती कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादनुसार आरोपी तानाजी किशन भुताळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुखेड न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश एस.बी.महाले यांनी आरोपी तानाजी भुताळे यास जन्मेठेपची शिक्षा शुक्रवार ३१ मार्च रोजी सुनावली. सरकारी पक्षाची बाजू सरकारी वकील सोमनाथ वरपे यांनी मांडली.