कलंबर सहकारी साखर कारखान्याचे भंगार विकून खाणाऱ्या खा. प्रताप पाटील चिखलीकरांना अशोकराव चव्हाणांच्या कारखान्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही- अमरनाथ राजूरकर.
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.४.नांदेडचे खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या 24 तासाच्या कार्यक्रमात राजकारण असते तर अशोक चव्हाण यांच्या 24 तासाच्या कार्यक्रमात फक्त विकासाचे ध्येय असते असे मत काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते एकनाथ मोरे यांनी मांडले. खासदार चिखलीकरांच्या तोंडात राम आणि मनाथ नथुराम असतो असे मोरे म्हणाले. खा. प्रातप पाटील चिखलीकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला आम्ही उत्तर देत आहोत असेही राजूरकर आणि मोरे म्हणाले.
अशोक चव्हाण कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षात राजणार नाहीत असा उल्लेख राजूरकर आणि मोरे यांनी केला. माजी केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, त्यांचे जावई भास्करराव पाटील खतगाकवर आणि त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनीच नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी काम केले असल्याचा उल्लेख केला. नांदेड जिल्ह्याचाच नव्हे तर महाराष्ट्राचा कायापालट करण्यात सर्वात मोठा वाटा डॉ. शंकरराव चव्हाण यांचा आहे आणि त्यानंतर त्यांचे सुपूत्र अशोकराव चव्हाण यांनी सुध्दा ते कोणत्याही विभागाचे मंत्री असतील त्या प्रत्येक वेळी त्यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याला न्याय दिलेला आहे. नांदेड जिल्ह्याला नेहमीच झुकते माप दिलेले आहे. नांदेड जिल्ह्याचा विष्णुपूरी प्रकल्प, पैठणचा जायकवाडी प्रकल्प कोणत्या पध्दतीने डॉ. शंकरराव चव्हाण यांनी मंजुर करून घेतला याचे पुरावे आजही आहेत. नांदेडमध्ये विद्यापीठ कोणी आणले, अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय कोणी आणले, नांदेडचा रेल्वे मार्ग ब्रॉडगेज कोणी केला, त्याचे विद्युतीकरण कोणी केले असे अनेक प्रश्न उपस्थित करून राजूरकर आणि मोरे म्हणाले ज्या नांदेड-लातूर रेल्वे कामाची सुरूवात झाली असे जाहीर केले पण खासदारांच्या या जाहिरीकरणाला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत या कामाला अद्याप मंजुरीच मिळाली नसल्याचे सांगितले यावरून प्रताप पाटील चिखलीकर किती खोटे बोलतात असे स्पष्टीकरण दिले. भारतीय जनता पार्टी खोटे बोल पण रेटून बोल या न्यायाने वागते आहे असे सांगण्यात आले. नांदेड जिल्ह्यातून 14 राष्ट्रीय महामार्ग जातात त्या 14 कामांपैकी 12 कामे अशोक चव्हाण यांनी केली आहेत. शंकरराव चव्हाणांनी तर महाराष्ट्रात 50-60 धरणे बांधली. विज मंत्री बनून महाराष्ट्राला प्रकाश दिला असे अनेक किस्से राजूरकर आणि मोरे यांनी सांगितले. प्रताप पाटील चिखलीकर यांनी माहूर येथे रोप वे चे काम सुरू झाल्याची प्रसिध्दी केली. परंतू त्या कामासाठी 300 ते 400 कोटी रुपये लागतात म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्या कामासाठी 50 कोटी रुपये मंजुर केले आहेत आणि त्यातून माहुर येथे लिफ्ट बांधण्याचे काम सुरू असल्याचे राजूरकर आणि मोरे म्हणाले.
अशोक चव्हाण कोणत्याही परिस्थिती भारतीय जनता पार्टीत जाणारच नाहीत हे ठासून सांगतांना अमरनाथ राजूरकर म्हणाले मग जाणारच नाहीत तर भारतीय जनता पार्टीच्या खासदारकीच्या तिकिटाचा प्रश्नच उदभवत नाही. नांदेड, सोलापूर आणि लातूर या तिन ठिकाणची वेगवेगळी वर्तमानपत्रांची कात्रणे राजूरकर आणि मोरे यांनी पत्रकारांना दाखवली त्यामध्ये फक्त सांगणाऱ्याचे नाव बदललेले आहे इतर मजकुर तिन्ही जिल्ह्यांमध्ये सारखास आहे. म्हणजे प्रेसनोट सुध्दा भारतीय जनता पार्टी तयार करून देते आणि त्यानुसार वेगवेगळे लोक वेगवेगळ्या ठिकाणी ती प्रेसनोट पत्रकारांपर्यंत वगवगळ लोक वेगवेगळ्या ठिकाणी ती प्रेसनोट पत्रकारांपर्यंत पोहचवतात असा आरोप राजूकर आणि मोरे यांनी केला.