किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

घोटी फाट्यावर मटक्याची बुक्की एका विद्यालयाच्या बाजुला खुले आम सुरू ! गोरगरिबांचे संसारावर फिरणार वरवंटा?

किनवट प्रतिनिधी: किनवट शहरासह खुलेआम चालणारा मटका,जुगार आताही बऱ्याच ठिकाणी खुल्या तर कांही ठिकाणी छुप्या पद्धतीने सुरू आहे मात्र किनवट पासून पाच किमी अंतरावर असलेल्या घोटी फाट्यावर मटक्याची बुक्की एका विद्यालयाला लागून खुलेआम सुरू आहे त्यामुळे या फाट्याला चांगले दिवस आले असून गोरगरीब बरबाद होऊ लागले आहेत ओपन जेवू देईना..क्लोज झोपू देईना.. अशी सध्य परिस्थिती असली तरी पोलिस मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत किनवट ठाण्याच्या हद्दीत मटका व गुटखा फोफावला आहे पोलिस मात्र डोळ्यावर हात ठेवून आहेत
आता ग्रामीण भागात मटक्याचे प्रस्थ एवढे वाढले आहे की बरेच जण मटका बुक्या घेण्यावरच दिवस रात्र घालवीत आहेत मटक्याच्या चिठ्ठ्या घेणारे ४०० रुपये मजुरीने काम करत आहेत मात्र मटका लावणाऱ्या गोरगरीबांचे संसार उध्वस्त होऊ पहात आहे मटक्याची चटक शासकीय नोकरी करणाऱ्यानाही लागली आहे मटका जुगार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे मग पोलिस गप्प का ? असा प्रश्न विचारला जात आहे मटका जुगार, अवैध देशी विदेशी दारू,अवैध गुटखा व इतर अवैध धंदे किनवट तालुक्यात मोठ्या प्रमाणावर डोके वर काढू पहात आहे किनवट माहूर महामार्गावर घोटीफाटा अवैध धंद्याचे माहेरघर बनले आहे वेळीच आवर घातला गेला नाही तर ग्रामीण भागातील कुटुंबे बरबाद होण्यास वेळ लागणार नाही
मटका वाढल्याने मटका चालकाविरुद्ध हद्दपारीची कार्यवाही भाडे मालकाविरोधात गुन्हा नोंद व ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिटात मटका चालतो अशा बिट जमादार यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे
किनवट -आदीलाबाद रस्त्यावर एका विद्यालयाला लागून भर रस्त्यावर मटक्याची बुक्की घेतली जात असल्याने पोलिसांनी रीतसर परवानगी दिली का ? असाही प्रश्न विचारला जात आहे मटक्यामुळे गोरगरिबांच्या संसाराची वाट लागली आहे कुठे ना कुठे दररोज संध्याकाळी नवरा बायकोत भांडण होत असल्याच्या घटना घडत असल्याचे बोलले जात आहे विद्यालयाजवळच मटकालय सुरू झाल्याने एखादेवेळी विद्यार्थी मटका लावायला येऊ नये नसता मटक्याची चटक लागली तर भावी पिढी उध्वस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे
मटक्याचा टाइम असा श्रीदेवी ओपन सकाळी ११.४५ क्लोज दुपारी १२.४५,पद्मावती सकाळी ११.४५ क्लोज दुपारी २.४५,टाईम बाजार दुपारी १.१० ओपन २.१० क्लोज ,मिलन डे दुपारी ३.२० ओपन व ५.१० क्लोज ,कल्याण सायंकाळी ५.१० ओपन व सायंकाळी ६.०५ क्लोज ,मिलन नाईट रात्री ९.१५ वाजता ओपन व रात्री ११.१५ वाजता क्लोज त्यामुळे ओपन जेवू देईना..अन क्लोज झोपू देईना.! अशी परिस्थिती तालुक्यात सर्वत्र निर्माण झाली आहे
जिल्ह्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या किनवट या आदिवासी भागाकडे गृह खात्याने वेळीच लक्ष देऊन मटका ,जुगाराचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे

466 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.