किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

वडील-भावाचा मृत्यू,संपत्तीवर भूखंड माफियांचा कब्जा* *पीडित महिला म्हणते,दहशतीत जगायचं कसं?कमल पत्रावळी

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.11.नांदेडमध्ये एका महिलेच्या प्लॉटवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल होऊनही आरोपी पोलिसांना सापडत नाही.त्यामुळे असहाय्य असलेली एकटी महिला दहशतीत वावरत आहे.

वडील आणि दोन भावांच्या अकाली मृत्युमुळे नांदेडमध्ये कमल पत्रावळी या महिलेवर कुटुंबाची जवाबदारी आलीय. मात्र ही एकटी महिला असल्याचे पाहून भूखंड माफिया रमेश पारसेवार याने आपल्या साथीदारांसह मिळून तिच्या प्लॉटवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला.सुदैवाने हा सगळा प्रकार cctv कॅमेरात कैद झाल्याने पोलिसांत गुन्हा नोंद झालाय. मात्र गुन्हा नोंद होऊनही आरोपी मोकाटच आहे.या महिलेचे कुटुंब प्रचंड दहशतीच्या खाली वावरत आहे.

मा.न्यायालयाने काल या आरोपींचा अटकपूर्व जामीन नाकारलाय.तरीही आरोपी अटक होत नाही.त्यामुळे या महिलेने आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे.

*न्यायालयाने नाकारला अटकपूर्व जामीन*

ग्रामीण पोलीस ठाणे नांदेडचे तपास अधिकारी अशोक घोरबांड म्हणतात,कमल पत्रावळी यांच्या वडिलांची संपत्ती आहे.

त्यावर काही लोकांनी कब्जा केला. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी कागदपत्रांची फाईल न्यायालयासमोर हजर केली.या आरोपीची अटकपूर्व जामीन न्यायालयाने नामंजूर केली.

53 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.