धर्माबाद नगरपरिषद कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अशोक घाटे.तर उपाध्यक्षपदी शंकरराव कांबळे यांची निवड!
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.19.जिल्यातील धर्माबाद येथील नगरपरिषद कर्मचारी पतसंस्थेच्या अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत स्वच्छता विभाग प्रमुख अशोक घाटे यांची अध्यक्षपदी तर शंकरराव कांबळे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
सहाय्यक दुय्यम निबंधक अधिकारी कार्यालयामध्ये अध्याशी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम.टी.सावळेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नऊ सदस्यीय धर्माबाद नगरपरिषद कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक आज अतिशय चुरशीची झाली. यामध्ये ऐनवेळी यु टर्न घेतलेल्या निवडणुकीत अशोक घाटे यांची अध्यक्षपदी निवड झाली.
उपाध्यक्षपदी शंकरराव कांबळे तर सदस्य पदी दत्तू गुर्जलवाड,गंगाधर उर्फ जडेजा सूर्यवंशी,बाबू मिसाळे, सावित्राबाई झुंजारे,आड्याबाई सूर्यवंशी,दीपक कोठारे,भीमराव सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली. हे मतदान सर्वोंसमक्ष हात वर करून घेण्यात आले असून पाच विरुद्ध चार अशी निर्णायक चुरशीची निवडणूक झाली.
उपरोक्त निवडीचे नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सौ.निलम कांबळे, पतसंस्थेचे कार्यालयीन सचिव किशनराव वंगल,सहसचिव बाबुभाई तानुरकर,कामगार नेते कॉम्रेड मुकुंदराव कदम, नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक मनोहर तुंगेनवार, निवडणूक विभाग प्रमुख रुखमाजी भोगावार,लक्ष्मण झुंजारे, राजेश्वर खटके,सूर्यकांत मोकले,सविता जुन्नेवार,अभियंता राजेश स्वामी यांच्यासह अनेकांनी कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
नगरपालिका कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना योग्य वेळी नगरपरिषद कर्मचारी पतसंस्थेमार्फत कर्जपुरवठा करणे व ते विहित वेळी सक्तवसुली करणे यासाठी दक्ष राहून कुठलेही गटातटाचे राजकारण न करता त्यांच्या समस्या समजून घेऊन नगरपरिषद कर्मचारी पतसंस्थेला वैभवाचे दिवस आणून देईल असे प्रांजळ प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक घाटे यांनीआमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.