किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

सकल मातंग समाजाचा भव्य मोर्चा २२ फेब्रुवारीला आझाद मैदानावर धडकणार..सुरेशचंद्र राजहंस* *आरक्षणाचे अबकड वर्गीकरण आणि बार्टीच्या धरतीवर आर्टी झाली पाहिजे

विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

*मुंबई*:दि.१४.सकल मातंग समाजाच्या वतीने २२ फेब्रुवारी २०२३ रोजी आझाद मैदान या ठिकाणी जवाब दो आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाला राज्यभरातून अंदाजे ५० हजारापेक्षा अधिक लोक उपस्थित राहणार आहेत. आरक्षणाचे अबकड वर्गीकरण आणि बार्टीच्या धरतीवर मातंग व तत्स्म समाजाच्या मुलांसाठी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) स्थापन झाली पाहिजे, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती मातंग समाजाचे नेते व ‘जवाब दो’ आंदोलनाच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली.
नवी मुंबईतील जुईनगरच्या साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात जवाब दो आंदोलनाची दिशा व नियोजन ठरवण्यासाठी नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीला मातंग समाजातील मान्यवर नेते, विविध संघटना व त्या संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते आणि मातंग समाजातील अधिकारी वर्ग, तरुण होतकरू समाज बांधव, महिलाभगिनी उपस्थित होत्या.
या बैठकीत सर्वांच्या लेखी व तोंडी सूचना तसेच मार्गदर्शनानुसार आंदोलनाच्या दृष्टिकोनातून उपाययोजना कशा कराव्यात याचे अवलोकन करण्यात आले. या बैठकीत प्रमख दोन मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. अनुसुचित जातीसाठी असलेल्या आरक्षणाचे लोकसंख्येचे प्रमाणात अबकड वर्गीकरण आणि बार्टीच्या धरतीवर आर्टी झालीच पाहिजे या प्रमुख मागण्या आहेत. तसेच मातंग समाजाची अस्मिता व मातंग समाजाचे नेते स्व. बाबासाहेब गोपले आणि आरक्षण अबकड वर्गीकरणात बलिदान दिलेल्या स्व. संजय ताकतोडे यांचा फोटो बॅनरवर लावण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या मोर्चासाठी बैठकीमध्ये वेगवेगळ्या कमिटी गठीत करण्यात आल्या.
हे आंदोलन कोणत्याही एका संघटनेचे नसून सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे ज्यामध्ये मातंग आणि तत्सम समाजाच्या प्रश्नावर काम करत असलेल्या सर्व सामजिक संघटनांचा/ संस्थांचा समावेश असणार आहे. त्यामुळे सर्व संस्था,संघटना नेते आणि कार्यकर्ते यांनी समाजाचे जे मुख्य प्रश्न आहेत ते समाजापर्यंत पोहोचवून २२ तारखेच्या जवाब दो मोर्चात जास्तीत जास्त संख्येने समाज उपस्थित राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन करण्यात आले असल्याचे राजहंस म्हणाले.

234 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.