बार्टी पुणे येथे लोकस्वराज्य आंदोलनाचे बेमूदत धरणे आंदोलन उच्य न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधिशामार्फत बार्टीच्या कारभाराची चौकशी करा -प्रा.रामचंद्र भरांडे यांची मागणी
( नांदेड प्रतिनिधी ):
लोकस्वराज्य आंदोलन संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्र भरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ पासुन बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असुन, बार्टीच्या योजनांचे समन्याय प्रमाणात अनुसूचित जाती प्रवर्गातील जाती समुहात लाभार्थी व लाभवंचित जातीनिहाय अ.ब.क.ड वर्गिकरण करण्यात यावे,बार्टीच्या योजनेचा लाभार्थी कोणत्या जातीचे आहेत ? व लाभवंचित जाती कोणत्या आहेत ? चाळीस वर्षाचा लेखाजोगा मांडण्यासाठी उच्य न्यायालयाच्या माजी न्यायमुर्तीची समीती गठीत करून जात पक्षपाती भ्रष्ट कारभाराची उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधिशा मार्फत चौकशी करण्यात यावी. मागील चाळीस वर्षात बार्टीचे महासंचालक कोणत्या जातीचे झाले ? या पदावर अनुसूचित जातीतील पात्र व्यक्तींना संधी मिळाली का ? एक जातीय वर्चस्व मोडीत काढण्यासाठी अ.ब.क.ड असे वर्गिकरण करून सर्व घटकांना फिरत्या क्रमांकानुसार संधी देण्यात यावी,बार्टी महासंचालक गजभिये यांच्या कामकाजाची चौकशी करण्यात यावी. फेलोशीप,योजना व उपक्रम याचा लाभ वितरण करतांना उपजातीच्या लोकसंख्येचा निकष निश्चित करण्यात यावा,आदी प्रमुख मागण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,बार्टी पुणे येथे अॅड.दत्तराज गायकवाड,अॅड.नितीन पोळ यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ पासुन बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन संजय राठोड,मंत्री अन्न व प्रशासन महाराष्ट्रराज्य मुंबई मार्फत मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेचा मूळ हेतू समतेचा मुलमंत्र घेऊन अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व जाती समुहाच्या घटकांना मुख्य प्रवाहात सहभागी करुन घेणे ,त्यासाठी तरूणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे तसेच संशोधनासाठी प्रोत्साहन देणे हा मुद्दा महत्वाचा होता.अनुसूचित जातीमध्ये ५९ जातीचा समावेश असुन,त्या सर्वांना योजनेचे समन्यायी वितरण होणे अपेक्षित होते परंतु शासनाने मागील चाळीस वर्षात हजारो कोटी रूपये या संस्थेवर खर्च केले मात्र याचा लाभ विशिष्ट जातीलाच झाला असुन,त्याचबरोबर महासंचालक पदाच्या यादीवर नजर टाकल्यास असे लक्षात येते की,यामध्येही एकाच जातीचा भरणा झालेला दिसुन येत असुन.यासाठी १३ फेब्रुवारी २०२३ पासुन बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तरी,तरी अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व लाभवंचित समूहातील युवक व युवतींने बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सचिन वाघमारे,सुरेश वाघमारे,रवि गाडेकर,नागोराव कुडके,नागनाथ पवार,संतोष तेलंग,गजानन वाघमारे,अंकुश गायकवाड,राजेश शेळके,आदी लोकस्वराज्य आंदोलन पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.