राज्यपाल दत्तक जावरला गावातील शासकीय आश्रम शाळा दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यास प्रकल्प अधिकारी यांची टाळाटाळ
किनवट प्रतिनिधी
किनवट तालुक्यातील राज्यपाल दत्तक जावरला गावातील निवासी शासकीय आश्रम शाळेतील मुख्याध्यापका सह सर्वच कर्मचारी यांनी नियमबाह्य घर भाडे उचल करणे अभिलेखे गहाळ करणे बाबत दिनांक 01/09/2022 रोजी तक्रारी आर्जा आधारे पुराव्यासह तक्रार देऊनही चौकशी समिती प्रमुख श्री डी आर शिंगारे यांनी स्वयं स्पष्ट अहवाल दिला नसल्याने लेखा अधिकारी श्री पाईकराव यांच्याकडे सदर अहवालावर पुन्हा तपासणी करून दोषी कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यास जाणून बुजून टाळाटाळ विलंब करत असल्याचे दिसून येते.
किनवट प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकूण 16 निवासी शासकीय आश्रम शाळा कार्यरत आहेत त्यापैकी किनवट तालुक्यातील जावरला आश्रम शाळा ही राज्यपाल दत्तक गावामध्ये असल्याने शाळेवर मुख्याध्यापक सोडून इतर दहा कर्मचारी यांना निवासस्थान उपलब्ध आहेत परंतु सदर शाळेवर शासन निर्णयानुसार निवासी शाळेवर उपलब्ध 10 निवासस्थानाचे घर भाडे कपात होत नसल्याचे माहिती अधिकारात प्राप्त माहितीवरून दिसून आल्याने जागरूक नागरिक या नात्याने राज माहूरकर व विजय वाघमारे यांनी दिनांक 01/09/2022 रोजी प्रकल्प अधिकारी यांना सर्व पुराव्यानिशी तक्रारी अर्ज सादर केला होता प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक लेखा अधिकारी श्री डी आर शिंगारे व एस पी पोहरकर आदिवासी विकास नियोजन तथा पालक अधिकारी जावरला यांची संयुक्त समिती नेमण्यात आली होती तक्रारी अर्जातील नमूद बाबीवर अभिलेखे तपासणी करून अहवाल सादर करण्यास दिनांक 12/10/2022 रोजी पत्र क्रमांक 3568 नुसार चौकशी समिती नेमणूक करण्यात आली होती सदर समिती अभिलेखे तपासणी करून अहवाल सादर करण्यास विलंब लावत असल्याचे सुद्धा दिसून येत आहे प्रकल्प कार्यालयात समक्ष भेटून कारवाईबाबत अर्जदारांनी विचारणा केली असता समितीचे प्रमुख श्री डी आर शिंगारे यांनी चौकशी अहवाल स्वयं स्पष्ट चौकशी अहवाल सादर न केल्याने सदर अहवालावर प्रकल्प कार्यालयातील लेखा अधिकारी श्री पाईकराव यांना पुन्हा सदर अहवाल तपासून सादर करण्यास कळविण्याचे समजते यावरून असे स्पष्ट होत आहे की जावरला राज्यपाल दत्तक गावातील शासकीय आश्रम शाळेवरील दोषी कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी कशा पद्धतीने चौकशी अधिकारी व लेखा अधिकारी जाणून बुजून विलंब लावून टाळाटाळ करीत असल्याचे अर्जदाराचे ठाम मत झाले असून अर्जदार हे अप्पर आयुक्त अमरावती यांच्याकडे सर्व प्रकरणाची जावरलासह सर्व निवासी आश्रम शाळेतील गैरकारभाराची व शासन निर्णयाला कर्मचाऱ्याकडून व अधिकाऱ्याकडून केराची टोपली कशी दाखवतात याबाबत लेखी तक्रार सादर करणार असल्याचे प्रतिनिधी जवळ बोलून दाखवीले