पञकारांनी लेखनितून ‘शोधा,खोदा,लिहा ‘ नीती अवलंबावी..बापू गायखर । सत्कार प्रसंगी घेतला लेखनीचा धांडोळा
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.१९.समकालीन पञकारिता नि झपाट्याने बदललेले स्वरूप लक्षात घ्यावे लागेल पत्रकारितेची संहिता बदलते आहे.उद्भवलेले प्रश्न आणि त्याची उकल ज्या ज्यांना करता येते तेच या काळात टिकतील.
‘शोधा,खोदा,लिहा’ या सूत्रानुसार आता आपण बदलले पाहिजे . पत्रकारांची एकजूट आणि संघटन हाही प्रश्न तितकाच महत्त्वाचा असून सर्वांनी एक दिलाने काम करावे.मग माञ नक्कीच सलग्नता, ऐक्य याचे फळ मिळते.असे भावोउद्गार मराठवाडा विभागाचे संघटक बापू गायकर यांनी काढले.
लोहा येथील वृत्तपत्र महासंघाच्या एका कार्यक्रमात सत्कार प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराज पाटील पवार , प्रमुख उपस्थितीत प्रदीप कुमार कांबळे, विजयकुमार चन्नावार,पांडुरंग रहाटकर,संजय कहाळेकर होते. पुरोगामी महाराष्ट्रात पत्रकारांनी दलितांवरील अन्याय उघडकीस आणणारे प्रश्न,खेड्यापाड्यातील एकशिक्षकी शाळेची दैना, गायरान जमिनींचे वास्तव, कॉंग्रेसची देशातील पीछेहाट व महाराष्ट्रातील राजकारण, स्त्रियांचे प्रश्न,निष्प्रभ कामगार संघटना, पोलीस दलाची स्थिती, शहरीकरणात नद्यांचे अस्तित्व, वृत्तवाहिन्यांची टीआरपीसाठी काहीही करण्याची तयारी, शेतीवाडीशी निगडीत गावाच्या समस्या आधी घटनेवर प्रकाश टाकावा लागेल.प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मराठवाडा संघटकपदी ‘सकाळ’ चे बातमीदार बापू गायखर यांची निवड करण्यात आली. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे,राज्य संपर्कप्रमुख रमेश मोपकर,मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे,राज्य महिला संपर्क प्रमुख विजयाताई काचावार,राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर,राज्य सल्लागार प्रा.वसंत बिरादार, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड,जिल्हा सरचिटणीस हरजिंदर सिंग संधू यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी नांदेड जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव सोनकांबळे, तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार,उपाध्यक्ष संजय कहाळेकर,सरचिटणीस प्रदीप कुमार कांबळे,सचिव मारुती पाटील चव्हाण,कोषाध्यक्ष रमेश पाटील पवार,कोषाध्यक्ष संतोष तोंडारे,सहसचिव तुकाराम दाढेल, अशोक सोनकांबळे,शैलेश ढेंबरे, शिवराज दाढेल,विश्वनाथ कांबळे बाळासाहेब बुद्धे विजयकुमार चन्नावार पांडुरंग रहाटकर,गोविंद पाटील पवार,नितीन होळगे आदी उपस्थित होते.