किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

जिथे अद्यापही पोहचलं नाही इंटरनेट तेथील शिष्यवृत्ती निकाल 100 परसेंट #जिल्हा परिषद पांगरपहाड शाळेतील सहा पैकी चार विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

किनवट : तालुका मुख्यालयापासून 58 किलोमीटर अंतरावर तेलंगणा सीमेवरील अतिदुर्गम अवघड क्षेत्रातील पांगरपहाड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ मध्ये उत्तुंग यश संपादन केले आहे. त्यांचा 100 टक्के निकाल लागला असून सहा पैकी चार विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. या बद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
    नुकताच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा- 2022 चा निकाल जाहीर झाला आणि अवघड क्षेत्रातील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा पांगरपहाडने भव्यदिव्य यश संपादन केले आहे. या शाळेतील, कार्तिक विनोद जाधव, अक्षय जितेश जाधव, , गायत्रीदेवी सुनील जाधव, अस्मिता रवींद्र राठोड हे चार विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून तनवी संतराम जाधव व कृष्णा विक्रम जाधव शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे गुणीजन विद्यार्थी, त्यांना मार्गदर्शन करणारे शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक अनिल कांबळे व  सहशिक्षक सचिन सरवदे यांचे गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड ,   अप्पारावपेठचे केंद्रीय मुख्याध्यापक प्रमोद रत्नाळीकर, केंद्रप्रमुख सत्यनारायण कोड ,उत्तम कानिंदे, राजा तामगाडगे, सचिन धाकडे यांनी कौतुक केले आहे.

यागावातून भ्रमण ध्वनीवरून संदेश द्यायचा असेल तर पाण्याच्या टाकीवर चढावं लागतं तेव्हा कसाबसा संपर्क होतो. येथे ना नेट ना नेटवर्क. परंतु गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांच्या ‘मिशन 500 स्कॉलर’ या उपक्रमांतर्गत आम्ही मेहनत घेतली. सहशिक्षक सचिन सरवदे यांनी यासाठी प्रचंड सराव घेतला. त्यांच्याच परिश्रम व मार्गदर्शनाचं हे यश आहे.
-अनिल कांबळे ,
मुख्याध्यापक

96 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.