नांदेड पुन्हा हदरले महिलेवर गोळीबार? महिलेच्या सुरक्षा बाबत पुन्हा प्रश्न चिन्ह
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.10.सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्या आपल्या दुचाकीवरुन शांतीनगरहून मगनपुरा येथे आपल्या घरी जात होत्या. त्यावेळी बाफना उड्डाणपुलावर एका दुचाकीवरुन आलेल्या रहीम खान,जफर व अन्य एक अशा तिघांनी अडविले. यातील रहीम खानशी ओळख असल्याने सविता गायकवाड थांबल्या.त्यांच्याशी वाद घातल्यानंतर त्यांच्यावर रहीम खानने गोळीबार केला. यात सविता गायकवाड यांच्या डावा हाताच्या दंडाला गोळी लागली. गोळीबार करून हल्लेखोर पसार झाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,आतिक नावाच्या व सविता गायकवाड या दोघांमद्धे एक आयचर खरेदी विक्री संदर्भात भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील आतिकला अटक झाली होती.मात्र,सविता गायकवाड यांना फौजदारी प्रक्रिया संहितेप्रमाणे नोटीस देवून सोडण्यात आले होते. या गुन्ह्यात परभणी येथील रहिम खान या व्यक्तीने साक्ष दिली होती.
त्यानंतर सविता गायकवाड यांनी आपल्या ओळखीच्या फैसल सोबत 7 जानेवारी रोजी रहीम खानच्या परभणी येथील घरी जावून गोंधळ घातला.या प्रकरणी कलम 452, 323, 506 प्रमाणे सविता गायकवाड आणि फैसल या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.त्यानंतर दि.9 जानेवारी काल रात्री हा रहीम खान, जफर व अन्य एका तिसऱ्याने हा प्रकार घडवून सविता गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.
सविता गायकवाड यांनी दिलेल्या जबाबानुसार इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 12/23 भारतीय दंडसंहितेच्या कलम 307, 34 तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शेख असद यांच्याकडे देण्यात आला आहे.
या घटनेनंतर सवितागायकवाड यांनी इतवाराचे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांना मोबाईलवरून ही माहिती दिली. तेंव्हा पोलिसांनीच त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आपल्याच गाडीतून दाखल केले.
रुग्णालयात पोलीस अधीक श्रीकृष्ण कोकाटे,अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,पोलीस उपअधीक्षक डॉ. सिध्देश्वर भोरे यांनी भेट देऊन सविता गायकवाड यांची विचारपूस केली.