किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

बालकांच्या निरोगी आयुष्यासाठी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास प्रतिसाद खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आरोग्य शिबीर संपन्न

किनवट, दि. ३० (वार्ताहार)- खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिर उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि वाडिया हॉस्पीटल मुंबई आणि राजेंद्र अग्रवाल (रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर २०२१-२२, मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने किनवट, गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात शून्य ते १८ वयोगटातील लहान मुलांसाठी दोन दिवसीय मोफत 2D इको तपासणी आणि हृदयशस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरास किनवटसह, माहूर, हिमायतनगर, हदगाव तालुक्यातील गरजवंत नागरीकांचा प्रतिसाद मिळाला. या शिबिरासाठी मुंबई येथील बी. जे. वाडीया मल्टी सुपर स्पेशालिटी हास्पीटलचे तज्ज्ञ डॉ. श्रीपाल जैन, डॉ. शिवकुमार तडका यांच्या टिमने 2D इको तपासणी केली.
या शिबिराला तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील , माजी उपसभापती गजानन कोल्हे, शहर प्रमुख सुरज सातूरवार, मनोज तिरमनवार, गोकुंदा सरपंच सौ.अनुसया संजय सिडाम, वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज घडसिंग, वैद्यकीय अधिकारी लोंढे, डॉ.बालाजी केंद्रे, डॉ ओहोळ, डॉ.ढोले,डॉ तेलंग, डॉ.जाधव, डॉ.भालेराव मॅडम, डॉ राठोड, डॉ.जुबेरी, डॉ.बोडके, डॉ.तोटवाड, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमचे डॉ. चंद्रे, डॉ. गोणेवार, डॉ. सोनटक्के, डॉ. पल्लेवाड, डॉ. आरटवाड, डॉ. शिवशंकर केंद्रे, डॉ.सरोदे, डॉ. आंबेकर, डॉ. वट्टमवार, कपिल रेड्डी, चंद्रकांत जयभाये, सुरेश घुमडवार, अशोक जाधव, गजानन जाधव, दासू गावत्रे यांची उपस्थित होती.
किनवटच्या गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात शून्य ते १८ वयोगटातील लहान मुलांची 2डी इको तपासणी व हृदय शस्त्रक्रिया शिबीरात ज्या बालकांना ह्रदयाचा गंभीर आजार आढळुन आला आहे त्या सर्व बालकांना खासदार हेमंत पाटील यांच्या मदतीने बी. जे. वाडीया मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मुंबई येथील रेडिओलॉजिस्ट तज्ज्ञ डॉ. श्रीपाल जैन आणि डॉ. शिवकुमार तडका यांच्या मार्गदर्शनाखाली या बालकांवर ह्दयाची शस्त्रक्रिया केली जाणार आहेत.
चौकट – शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि वाडिया हॉस्पीटल मुंबई आणि राजेंद्र अग्रवाल (रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर २०२१-२२, मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील जवळपास आठशे बालकांची 2D इको तपासणी करण्यात आली. यात दोनशेच्या जवळ बालकांना गंभीर आजार असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या प्रथम तपासणीतून निदर्शनास आले आहे. सर्वसामान्य घरातील मुलांना देखील योग्यवेळी योग्य उपचार मिळावेत. त्यांचे आयुष्य निरोगी रहावे या मुख्य उद्देशाने या आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यास दोन्ही जिल्ह्यातुन उत्तम असा प्रतिसाद मिळाला आहे. 2डी इको तपासणीत ह्दया संबंधी आढळुन आलेल्या आजारावर लवकरच मुंबई येथील बी. जे. वाडीया मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अगदी मोफत आरोग्य उपचार केले जाणार आहेत. कुठल्याही बालकांना आजार घेऊन जगण्याची वेळ येऊ नये प्रत्येक बालकास निरोगी आयुष्य लाभावे हाच या शिबीरा मागचा हेतु आहे.

90 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.