वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात कायदेविषयक शिबिर संपन्न.
किनवट,: तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात आज (ता.९)सकाळी साडेआठ वाजता दिवाणी व फौजदारी न्यायाधिश शंकर बा.अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबिर घेण्यात आले.यावेळी सहदिवाणी न्यायाधिश विजय गो.परवरे यांनी वन कायद्यासंदर्भाने सविस्तर असे मार्गदर्शन केले.यावेळी मंचावर वकील संघाचे सचिव अॅड.पंकज गावंडे, कोषाध्यक्ष अॅड.सुनिल येरेकार व माजी उपाध्यक्ष अॅड.मिलिंद सर्पे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.प्रास्ताविक व सूत्रसंचालन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस.के.तिरमनवार यांनी केले.
शिबिरास वन अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.दरम्यान,तालुका विधी सेवा समितीचे सचिव तथा गटविकास अधिकारी सुभाष धनवे यांनी नेहमीप्रमाणेच या शिबिराकडे पाठ फिरवली होती.शिबिराच्या यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी एल.वाय.मिसलवार , जुब्बेरखान पठाण व पोलिस कर्मचारी श्री.पठाण यांनी पुढाकार घेतला.