किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

क्रांतिवीर कुमराम भीम यांच्या स्मारकाचा अभ्यास दौरा ; कुमराम भीम यांचा हक्कासाठीचा लढा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी -डॉ अंकुश गोतावळे

जिवती :- तेलंगणा राज्यातील कुमराम भीम जिल्ह्यातील जोडेघाट येथे क्रांतिवीर कुमराम भीम यांचे स्मारक असून त्या स्मारकास साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे फाउंडेशन च्या वतीने अभ्यास दौरा आयोजित केला होता. दौऱ्यादरम्यान फाउंडेशन च्या वतीने सर्वप्रथम क्रांतिवीर कुमराम भीम यांच्या पुतळ्यास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर तेलंगणा सरकारने उभारलेल्या संग्रहालयाची पाहणी केली आणि कुमराम भीम यांचा जीवनक्रम जाणून घेतला.

त्यानंतर जोडेघाट गावातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून कुमराम भीम यांच्या कार्याची आणि आदिवासी समाजासाठी त्यांनी लढलेल्या लढ्याची सविस्तर माहिती घेतली.त्यानंतर जोडेघाट येथील स्मारकाच्या खुले रंगमंचावर सभा घेण्यात आले त्यावेळी डॉ अंकुश गोतावळे यांनी सर्व शिष्टमंडळास कुमराम भीम यांच्या बद्दल सविस्तर माहिती दिली. त्यावेळी त्यांनी सांगितले की कुमराम भीम यांनी जल, जंगल, जमीन यावर मूलनिवासी आदिवासी यांचा परंपरागत हक्क असून तो हक्क निजाम सरकारने आदिवासीकडून हिरावून घेतला होता आणि आदिवासीच्या शेतीवर कर लावून त्यांनी शेतामध्ये पिकवलेले धान्य कर म्हणून बळजबरीने घेऊन जात असत तसेच शेतीचे अवजारे आणि घरे बनवण्यासाठी जंगलातील लाकडे तोडल्यास आदिवासी बांधवाना निजाम सरकारचे अधिकारी गावाच्या मध्यभागी सर्वासमक्ष सजा देत असत. त्यामुळे कुमराम भीम यांनी निजाम सरकारविरुद्ध बंड पुकारले आणि निजाम सरकारच्या अधिकाऱ्यांना गावबंदी केली आणि निजाम सत्तेविरुद्ध शस्त्र उचलून जल, जंगल, जमीन यावर आदिवासीचा हक्क असून तो त्यांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी लढा दिला. क्रांतिवीर कुमराम भीम इथेच थांबले नाहीत तर त्यांनी संपूर्ण गोंडवाना प्रांताच्या जमिनीवरून निजामाने कब्जा हटवावा आणि निघून जावे असा संदेश असिफाबाद चे तत्कालीन निजामाचे कलेक्टर च्या माध्यमातून निजामास पाठविला. आणि गोंडवाना प्रांताच्या जमिनीवरून निजामास हाकलून लावण्यासाठी सेना बनवून लढत राहिले. असाच लढा चालू असताना असिफाबाद येथील निजाम सरकारच्या अधिकाऱ्याने कुमराम भीम यांच्या एका साथीदारास फितूर केले आणि कुमराम भीम यांच्या सेनेचा तळ असलेल्या ठिकाणी हमला करून गोळीबार केला त्यावेळी निजामच्या सैन्याशी लढताना कुमराम भीम आणि त्यांच्या अनेक साथीदाराना विरगती प्राप्त झाली. मात्र कुमराम भीम यांच्या या लढ्यामुळेच आदिलाबाद आणि असिफाबाद जिल्ह्यामधील सर्व जमिनीवर निजाम सरकारने आदिवासीचा हक्क मान्य केला आणि त्यांनी जमिनीच्या मालकी हक्काचे पट्टे आदिवासी बांधवाना दिले आणि इतरही अधिकार बहाल केले.त्यामुळे तेलंगणा राज्याच्या या दोन जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज आज समृद्ध होताना दिसत आहे. तसेच आज जिवती, कोरपणा, राजुरा तालुक्यातील आदिवासी बांधवाकडे जे जमिनीचे निजामकालीन पट्टे आहेत ते कुमराम भीम यांच्या आंदोलनाचीच देण आहे. म्हणून प्रत्येक तरुणाने याचा बोध घेऊन सामाजिक न्याय हक्कासाठी लढले पाहिजे, जरी त्या लढ्यामुळे आपणास स्वतःस प्रत्यक्ष फायदा झाला नाही तरी येणाऱ्या अनेक पिढ्याना त्याचा फायदा होत असतो म्हणून सदैव लढत राहिले पाहिजे असे डॉ गोतावळे यांनी सांगितले त्यानंतर इतरांचेही मार्गदर्शन झाले.

चर्चासत्रानंतर सामूहिक वनभोजन झाले आणि अभ्यास दौऱ्याची सांगता झाली. सदर अभ्यास दौऱ्यात प्रामुख्याने डॉ अंकुश गोतावळे, प्रा सुग्रीव गोतावळे, श्री भानुदास जाधव, श्री देविदास कांबळे, श्री बळवंत गोतावळे,डॉ पांडुरंग भालेराव,श्री यादव भालेराव,श्री दत्ता दोरे सर, श्री दीपक गोतावळे सर, श्री बालाजी वाघमारे , श्री भगवान कांबळे, श्री संतोष गोतावळे, श्री विजय गोतावळे, श्री रणजित सूर्यवंशी, श्री बळीराम भालेराव, श्री गोविंद वाघमारे, श्री विनोद भालेराव, श्री विजय डकरे, श्री रवीश गोतावळे, श्री मिथुन गोतावळे, श्री लहुजी गोतावळे, श्री मिथुन गोतावळे, श्री सुनील गोतावळे,श्री धर्मा गोतावळे, श्री मसना गोतावळे, श्री काशिनाथ गोतावळे यांचा समावेश होता

127 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.