किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

दिव्यांग,वृध्द,निराधार यांच्या अनेक प्रश्नासाठी नायगाव तहसिलवर मोर्चाने परिसर दणानला -चंपतराव डाकोरे पाटिल

नायगाव/ प्रतिनिधी,
दिव्यांग,वृध्द,निराधार,गायरान पट्टेधारक,शेतमजुर शेतकर्याच्या अनेक प्रश्नासाठी दिव्यांग,वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्ट अखिल भारतीय किसान मजदुर सभा यांच्या वतीने भव्य मोर्च्या २१ जुलै २०२२ रोजी दिव्यांग संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल,केंद्रिय सचिव अशोक घायाळे यांच्या नेत्रत्वाखाली हजारोच्या संख्येनी मोर्च्या खालिल मागन्यासाठी घोषनानी परीसर दणानला व मा.मुख्यमंत्री महोद्य यांना तहसिलदार यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.
*खालील मागन्या*
१) या राज्यातील दिव्यांग,वृध्द निराधाराना आधार कोनाचा व ते कोणतेहि काम करू शकत नाहि अशाना दरमहा एक हजार मिळनारे अनुदान चार ते पाच महिने दिले जात नाहि,व त्या अनुदानात दोन वेळेचा चहा साठी दुध तरी मिळत नाहि?तेहि चालु असलेल्या लाभदारकाना दरवर्षी
कुंटुबाचे एकविस हजाराचे ऊत्पन्नाचे,ह्यात प्रमाणपत्र, ईत्यादी कागदपत्र सादर करण्याचे
आदेश दिले,दिव्यांग,वृध्द,
निराधाराना ऊत्पनाची अट रध्द करा जसे राज्यातील मंत्री, आमदारान लाखो रू ऊतपन्न असताना त्यांना कोणतेहि अट का नाहि? दिव्यांग,वृध्द,निराधार दरमहा हजार रुपयासाठी तिजोरीत पैसे नसल्यामुळे चार ते पाच महिने पैसे मिळत नाहित.
लोकप्रतिनिधीना वेतनासाठी राज्यावर हजारो कोटि रुपये कर्ज असताना साठ हजार कोटि रूपयाचे कर्ज घेऊन त्यातील तिस कोटि रूपये माजीमंत्री, आमदार यांच्या निवृतीवेतनाच्या पेशंन विधैकाला मंजुरी दिली जाते दिनदुबळ्याना मानधनात वाढ का होत नाहि?
२) महाराष्ट् अतिवृष्टीने सतर टक्के नुकसान झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहिर करून हेक्कटरी पन्नास हजार नुकसान भरपाई द्या
३)तेलगना राज्याप्रमाणे खरीप व रब्बी हंगामासाठी हेक्टरी तिस हजार रू अनुदान द्या,
४) रास्त दुकान,व दिव्यांग,वृध्द,निराधाराचे अंगठा येत नसल्याने राषण,व अनुदान ऊचल करता येत नसल्यामुळे व्हिडीओ,तथा बायोमेट्टिक ने पुरवठा करा.
५) दिव्यांग कायदा २०१६ ची कठोर अंमलबजावणी करा
६) दपत्रर दिंरगाई कायद्याप्रमाणे दोषी अधिकारी यांच्यावर कठोर कार्यवाही करा
७) दिव्यांग बांधवाना ग्रामपंचायत,नगरपंचायत,नगरपालिका,महानगरपालिका,पंचायत समिती,जिल्हापरीषद यांचा दिव्यांग पाच टक्के निधी न देणार्यावर योग्य ते कार्यवाहि करा
ईत्यादी मांगन्यासाठी नायगाव तालुक्यातील दिव्यांग, वृध्द, निराधार,गायरान,पट्टेधारक
शेतमजुर यांचा मोर्चा तहसिल कार्यालय नायगाव येथे घोषनेने दणानला.
मोर्चा यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर पोटफोडे,चंपतराव डाकोरे पाटिल,विठल बेलकर, अशोक घायाळे, मानेजी पाटिल,गुंडाजी बोयाळ,ईत्यादी हजारो कार्यकर्ते ऊपस्थित होते असे प्रसिध्दि पत्रक जि.संपर्क नागोराव बंडे, यांनी दिली

55 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.