आदिवासी प्रकल्प समितीच्या महिला सदस्यापदी वनमाला तोडसाम यांची निवड। सारखणी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ.वनमाला तोडसाम यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार.
प्रतिनिधी – मजहर शेख, सारखणी
सारखणी – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यलय किनवट च्या प्रकल्प स्तरीय नियोजन आढावा समितीवर अध्यक्ष व अशासकीय सदस्यांची नियुक्ती शासनाच्या आदिवासी विकास विभागाने केल्या आहेत. यामध्ये अध्यक्ष म्हणून ऍड प्रकाश गेडाम यांची नियुक्ती झाली. अशासकीय सदस्य म्हणून नारायणराव सिडाम,प्रा.विजय खूपसे,संजय माझळकर,गणपत मडावी,नामदेव कातले,व महिला सदस्या म्हणून सारखणी ग्रामपंचायत चे महिला सरपंच सौ.वनमाला तोडसाम यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.दि.२३ मे रोजी सारखणी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ.वनमाला तोडसाम यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जंगोम दल नांदेड जिल्हा अध्यक्ष अंकुश आडे , विकास कुडमते विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष,धनराज पेन्दोर,गोपाल गेडाम, तसेच ग्राम पंचायत येथील ग्राम विकास अधिकारी एच.एम.वाडेकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, समाज बांधव उपस्थित होते.