सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानेच किनवट आगाराला विभागात नंबर एक वर पोहोचवण्यात यशस्वी झालो -सोनाळे
किनवट (प्रतिनिधी):
किनवट आगारातील संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानेच उत्पादनाच्या बाबतीत किनवट आगाराला नांदेड विभागात प्रथम क्रमांकावर आणण्यात यशस्वी झालो,असे प्रतिपादन आगारप्रमुख मिलिंद कुमार सोनाळे यांनी व्यक्त केले. किनवटचे आगारप्रमुख मिलींदकुमार सोनाळे यांची नुकतीच हादगाव येथे बदली झाल्यामुळे त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आगारात आयोजित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कार्याशाळा अधिक्षक यु.एच.खिल्लारे,गंगय्या सटलावार, वाहतूक निरीक्षक एस एस मुंडे, सुभाष भंडारवार, संतोष चनमनवार, नारायण बंपलवार,विजय परसोडे,सुधिर डुबेवार हे होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, किनवट आगार हे माझे घर असून आगारातील सर्व कर्मचारी माझ्या परिवारातील सदस्य प्रमाणे होते. संपूर्ण कर्मचाऱ्यांनी मला पुरेपूर सहकार्य केल्याचे ते म्हणाले.
आगारातील संपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी केलेल्या सोयी सुविधा व उल्लेखनीय कार्याचा पाढा कर्मचाऱ्यांनी आपल्या मनोगतून वाचला.या कार्यक्रमाला किनवट आगारातील चालक-वाहक,यांत्रिक व संपूर्ण प्रशासकीय कर्मचारी यांची उपस्थिती होते.