किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची सोलापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

सोलापूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेची सोलापूर जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.
यावेळी माढा तालुका, करमाळा तालुका, माळशिरस तालुका कार्यकारिणी व सोलापूर जिल्हाध्यक्ष यांच्या निवडी करण्यात आल्या. सदर कार्यक्रम टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रमाच्या हाॅलमध्ये आयोजित करण्यात आला होता. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हा अध्यक्ष आप्पासाहेब लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सोमनाथ खंडागळे, महिला जिल्हाध्यक्षपदी सौ. आशाताई चांदणे, जिल्हा उपाध्यक्षपदी श्रीमती विजयाताई कर्णवर, जिल्हा सचिव श्रीमती प्रमिला जाधव, तसेच माळशिरस तालुकाध्यक्षपदी शशिकांत कडबाने, उपाध्यक्षपदी किरण शेंडगे, माढा तालुका अध्यक्षपदी कुंदन वजाळे, तालुका उपाध्यक्ष सिद्धनाथ सावंत, करमाळा तालुका अध्यक्षपदी अगंद भांडवलकर, उपाध्यक्षपदी धनंजय पाटील, तालुका सचिवपदी अक्षय वरकड, तालुका सचिव हर्षवर्धन गाडे आदी पदाधिकाऱ्यांची निवड करून पुणे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब लोखंडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष आप्पासाहेब लोखंडे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे महाराष्ट्रात उत्कृष्ट कार्य सुरू असून या संघटनेत सहभागी झालेल्या पत्रकारांची पूर्णपणे काळजी घेतली जाते. पत्रकार व त्यांचे कुटुंबीय यांचे आरोग्य, शिक्षण व न्याय हक्कासाठी संघटना कार्य करीत असल्याचे सांगितले. याप्रसंगी राजकुमार डांगे यांची विशेष उपस्थित होती. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने वृद्धाश्रमातील सदस्यांना फळे वाटप करण्यात आली.

197 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.