भाजपा महिला मोर्चाच्या वतीने ‘द कश्मिर फाइल्स’ चित्रपटाच्या तिकिटांचे मोफत वाटप…. “भाजप महिला आघाडीच्या संकल्पनेला महिलांचा उत्सूर्त प्रतिसाद..”
किनवट। .आमदार भिमरावजी केराम यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट भाजपा महिला मोर्चाच्या वतीने ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या तिकिटांचे मोफत वितरण करण्यात आले असून महिला आघाडीच्या या संकल्पनेला महिलांंचा उत्स्फुर्त मिळाल्याने महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षांंनी समाधान व्यक्त केले आहे.
मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेला बॉलीवूड चित्रपट ‘द कश्मीर फाईल्स’ हा कश्मीरात वास्तव्यात असलेल्या कश्मीरी पंडीतांवर झालेल्या अन्याय अत्याचारावर आधारित आहे. तथापि चित्रपटाबद्दल अनेक सकारात्मक व नकारात्मक मतप्रवाह सध्या सोशल मिडीयावर व्यक्त होत असल्याने सध्या जिकडे तिकडे याच चित्रपटाची चर्चा जोरात सुरू आहे. चित्रपटात व्यक्त करण्यात आलेल्या भावनांना समर्पक प्रतिसाद म्हणून किनवट तालुका महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा सागर शिंदे यांच्या कुशल नेतृत्वाखाली आमदार भिमरावजी केराम यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 22 ते 24 मार्च या कालावधीत किनवट येथील चित्रपटगृहात सलग तिन दिवस दररोज ‘दोन शो’ याप्रमाणे तब्बल सातशे महिलांना हा चित्रपटाचे मोफत तिकीट उपलब्ध करून देण्यात आले… दरम्यान पहिल्या दिवशी भाजपा प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार भिमराव केराम यांचे सुपुत्र प्रतिक केराम यांच्यासह भाजपचे जेष्ठ नेते धरमसिंग राठोड, भाजपा महिला मोर्चा तालुका किनवटच्या महिला अध्यक्षा सौ.सागरताई शिंदे यांच्या हस्ते महिलांना मोफत तिकिटे देऊन चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला.. यावेळी विद्याताई पाटील यांच्यासह भावना दीक्षित, पायल जैस्वाल, पुनम दीक्षित, सुकेशनी कपाटे, मनिषा चौधरी व अनेक भाजपा महिला पुरुष पदाधिकारी उपस्थित होते….
एकंदरीत ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट मोफत दाखवून चित्रपटाविषयीच्या नकारात्मक भावनेला सकारात्मक दृष्टीकोन बाळगून आगळा वेगळा संदेश देणा-या भाजपा महिला मोर्चा तालुका किनवट यांच्यावर खास करून महिला वर्गातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून प्रत्यक्ष भ्रमणध्वनी व सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.. किनवट महिला आघाडीच्या या संकल्पनेस भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा चित्ररेखा ताई गोरे पाटील यांचेे खासकरून मार्गदर्शन लाभले असून भाजप प्रदेश कार्यकारीणी सदस्या संध्याताई राठोड व विद्यासागर निलावार यांचेेेही मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे महिला आघाडीच्या वतीने सांगण्यात आले आहे. तर समारोप कार्यक्रमाच्या वेळी भाजपा नेते सुधाकरराव भोयर यांंच्यासह चित्रपट आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत मुंडे यांनी महिला मोर्चाच्या पदाधिका-यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी जेष्ठ नेते राघु मामा चिन्नावार यांच्यासह भाजपा शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष उमाकांत पाटील, संतोष मरस्कोल्हे, बिभिषण पाळवदेसर, लखनसिंग दीक्षित तसेच अनेक भाजपा पदाधिकारी व महिला मोर्चा पदाधिकारी व पत्रकार मंडळी उपस्थित होते…
तर किनवट शहरात प्रथमच महिलांना अगदी मोफत तिन दिवस चित्रपट दाखवण्यात आल्याने भाजपा महिला मोर्चा तालुका अध्यक्षा सौ. सागर ताई शिंदे पाटील यांच्यासह सर्व भाजपा महिला पदाधिका-यांचे कौतुक करण्यात येत आहे…