किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

मराठवाडा जनता विकास परिषद किनवट तालुका शाखेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त , जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायणराव सिडाम यांची एकमताने निवड

किनवट : मराठवाडा जनता विकास परिषद किनवट तालुका शाखेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त , जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायणराव सिडाम यांची एकमताने निवड करण्यात आली . मराठवाडा जनता विकास परिषद किनवट तालुका शाखेची बैठक शिवाजीराजे महाविद्यालयाच्या सभागृहात दि . १३ फेब्रुवारी रोजी तालुका अध्यक्ष नारायणराव सिडाम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती . बैठकिला जनता विकास परिषदेचे जेष्ठ नेते गंगन्नाजी नेम्मानिवार , नरसिंगराव सातुरवार , मा . प्राचार्य वि.मा. शिंदे , प्राचार्य आनंद भंडारे प्रमुख पाहुने म्हणुन उपस्थित होते . बैठकित दि . विजय घोटी पाटील , दत्तराम राठोड , प्रा . किशनराव किनवटकर प्राचार्य चांदोबा वाघमारे या पदाधिकारी यांचे दुःखद निधन झाल्या बद्दल श्रध्दांजली वाहण्यात आली . बैठकित मनोगत व्यक्त करतांना नवनिर्वाचित अध्यक्ष सिडाम यांनी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातुन शासन दरबारी जिल्ह्यापासुन १५० किमी अंतरावर असलेल्या आपल्या तालुक्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय , स्वतंत्र पोलिस अधिक्षक कार्यालय , डि.एफ.ओ. कार्यालय अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या मागणीसाठी सर्वक्षेत्रामध्ये सक्रिय काम करणा – या कार्यकर्त्यांना कार्यकारिणी मध्ये समावेश करुन पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले . यावेळी जनता विकास परिषदेचे मा . जिल्हाध्यक्ष गंगण्णाजी नेम्माणीवार यांनीह आपले मनोगत व्यक्त केले . बैठकित किनवट – नांदेड रस्त्याच्या कामात ढिसाडपणा , शहरातील नळयोजनेच्या कामानिमित्य करण्यात येणारे खोदकाम चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी संबंधीतांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सर्वाणुमते ठरवण्यात आले . बैठकिला प्रा . उमाकांत इंगोले , मुक्तीराम घुगे , प्रा . डॉ . मार्तंड कुलकर्णी , प्राचार्य आनंद भंडारे , सागर शिलेवार , प्रा . डॉ . सुनिल व्यवहारे , प्रा . रविकांत सर्पे यासह जनताविकास परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते

533 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.