किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

बँकांनी तातडीने शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करावे -खासदार हेमंत पाटील

हिंगोली : खरीप हंगाम पेरणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बी- बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी हिंगोली जिल्हा आणि मतदारसंघातील बँकांनी शेतकऱ्यांना तातडीने पीककर्जाचे वाटप करावे याप्रकरणी खासदार हेमंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेऊन बँकांनी अद्याप कोणतीही सक्षम यंत्रणा कार्यान्वित केली नसल्यानेच शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यास विलंब होत आहे .

त्यामुळे बँकांनी तात्काळ पीककर्जाचे वाटप करण्यासाठी याबाबत यंत्रणा कार्यन्वित करण्याचे निर्देश दिले .
खरीप हंगाम तोंडावर येऊनही राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज पुरवठा करीत नसल्यामुळे हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला आहे. कोरोना विषाणू कालखंड , लॉकडाऊन , आणि मागील वर्षी झालेली अतिवृष्टी यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अश्या अवस्थेत अडकलेला शेतकऱ्याला पीककर्ज हा एकमेव पर्याय शिल्लक आहे . जगाचा पोशिंदा जगाला तरच देश जगेल, त्यामुळे शेतकऱ्याच्या हिताला प्रथम प्राधान्य दिले जावे , दरवर्षी शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटानी भरडून निघतो , त्यामुळेच शेतकऱ्यांकडे पीककर्ज घेऊन पेरणी करण्या व्यतिरिक्त पर्याय उरलेला नाही . खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून ठेवली असून शेतकऱ्यांना आता पेरणीची प्रतीक्षा लागली आहे आणि पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने बँकेकडून मिळणाऱ्या पीककर्जाची वाट पाहत आहेत, परंतु जिल्ह्यातील बँकांनी अजून कोणतीच यंत्रणा उपलब्ध केली नसल्याने अनेक शेतकऱ्यानी खासदार हेमंत पाटील यांच्याकडे तक्रारी करून पीककर्ज वाटपाची मागणी केली होती या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासोबत बैठक घेतली. दरम्यान त्यांनी बँकांनी शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज पुरवठा करावा या साठी जिल्हयातील सर्व बँक अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक लावावी अशी मागणी केली. या सोबतच बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य शेतकरी व ग्राहकांना सन्मानाची वागणूक द्यावी, अरेरावीची भाषा वापरू नये,कोणत्याही कागद पत्रासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, शेतकऱ्यांना सहकार्य करावे अशा सूचनाही खासदार हेमंत पाटील यांनी या वेळी केल्या.
या बैठकीस शिवसेना हिंगोली जिल्हा समन्वयक दिलीप बांगर, सहसंपर्क प्रमुख डॉ. रमेश शिंदे, उपजिल्हा प्रमुख परमेश्वर मांडगे, उध्दवराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक शशिकांत सावंत यांच्यासह आदी उपस्थित होते .

180 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.