भारतिय जनता पक्षातर्फे अॅड. रमण जायभाये लखमापूर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविणार.
माहूर/पद्मा गिऱ्हे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यावर येउन ठेपल्या असून ही निवडणूक लढण्यासाठी सर्वच पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे.
मागील पाच वर्षापूर्वी अॅड. रमण जायभाये यांनी बंजारा बहुल वानोळा जिल्हा परिषद गटातून भारतिय जनता पक्षातर्फे प्रथमच निवडणूक लढविली होती त्यावेळी त्यांना दुसर्या क्रमांकाची मते मिळाली.होती असे असले तरी अत्यंत संयमी, सुस्वभावी,गोरगरीब चारीत्यसंपन्न जनतेची सेवा करण्याची आवड असलेले सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे अॅड. रमण जायभाये यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत .
नव्याने होउ घातलेल्या लखमापूर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यासाठी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर देत जनसंपर्क सूरू केला असून त्यांना मतदारातून प्रथम पसंती मिळत असून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने भाजपा नेते तथा विधानसभा संयोजक अॅड. रमण जायभाये यांनी जनतेच्या आग्रहास्तव भारतीय जनता पक्षातर्फे लखमापूर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.