किनवट आर्य वैश्य समाज संघटने तर्फे निषेध
किनवट/प्रतिनिधी: आज दि. 14 फेब्रुवारी सोमवारी सकाळी 11 वाजता आर्य वैश्य समाजातर्फे अमरावती येथील महानगरपालिकेचे आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांच्या वर झालेल्या प़ाणघातक हल्ला प्रकरणी किनवट येथील आर्य वैश्य समाजातर्फे निषेध नोंदवण्या संबंधी मा. तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी दिनकर चाडावार, अजय चाडावार डॉक्टर अशोक चिन्नावार,दारमवार काका,अमित चिंनावर,प्रफुल्ल उपलेंचवार, विकास रेखावार व अन्य समाज बांधव उपस्थित होते.
559 Views