किनवट येथील भाजप नेते यादव जाधव यांनी भाजपला रामराम करत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश
किनवट शहर प्रतिनिधी ( राज माहुरकर)
किनवट प्रतिनिधी किनवट येथील भाजप नेते यादव जाधव यांनी भाजपला रामराम करत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला असून मुंबई येथील टिळक भवनात आयोजित काँग्रेस पक्षाच्या परभणी नांदेड औरंगाबाद कार्यकर्ता पक्ष प्रवेश सोहळ्यात त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते आपल्या शेकडो समर्थकांसह काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे यादव जाधव हे भाजपातील पहिल्या फळीचे नेते असून त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे किनवट तालुक्यात भाजपाला मोठी खिंडार पडली आहे
किनवट येथील भाजपाच्या पहिल्या फळीचे नेते यादव जाधव यांनी अखेर पक्षाला सोडचिट्ठी दिली असून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका तसेच किनवट तालुक्यातील 99 ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कार्यालयात आयोजित नांदेड परभणी औरंगाबाद कार्यकर्ता प्रवेश कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते आपल्या शेकडो समर्थकांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला त्यांच्यासमवेत किनवट तालुक्यातील इतर पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यात गोकुंदा येथील राष्ट्रवादीचे दिलीप पाटील,संजय जाधव वडगावकर भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे युवानेते नवीन जाधव,विनोद चव्हाण,कॉ अविनाश चव्हाण यांच्यासह अनेक सरपंच व सदस्यांचा समावेश आहे
किनवट तालुका भाजपातील पहिल्या फळीचे नेते म्हणून यादव जाधव यांना किनवट विधानसभा मतदारसंघात ओळखले जात होते माजी आमदार स्वर्गीय सुभाष जाधव यांचे धाकटे बंधू असल्यामुळे त्यांना किनवट विधानसभेत पुर्वीपासूनच कौटुंबिक राजकीय वारसा लाभला आहे पाच वर्षांपूर्वी त्यांनी पोलिस सेवेचा राजीनामा देऊन डी बी पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती परंतु पक्षात ते नेहमीच दुर्लक्षित झाले महिनाभरापूर्वीच आ भीमराव केराम यांचे खंदे समर्थक युवानेते सुभाषबाबू नायक राठोड यांनी भाजपला रामराम करून काँग्रेसचा हात हातात घेतला त्यानंतर आता भाजपाच्या प्रमुख नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे किनवट तालुक्यातील भाजपाच्या गोटात अस्वस्थता पसरली असून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आघाडी धर्माचे पालन झाले नाही तर यादव जाधव हे काँग्रेस पक्षाकडून किनवट विधानसभेचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत पोलिस सेवेचा राजीनामा देऊन मी राजकारणात प्रवेश केला त्यावेळी देश बचाना है तो भाजमे आवो असा भाजपचा नारा होता, सबका साथ सबका विकास असे आश्वासन दिल्यामुळे मी भाजपात गेलो पण या पक्षात निष्ठावंतांची कदर होत नाही असे सांगत सर आय प्रॉमिस यू, आय कमिट यु आगामी विधानसभेच्या निवडणुकीत किनवट विधानसभेचे आमदार काँग्रेसचा असेल असा आत्मविश्वास यादव जाधव यांनी यावेळी बोलताना दिला आहे या पक्षप्रवेश सोहळ्याला किनवट येथील काँग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत रेड्डी माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेमानीवार माजी नगराध्यक्ष के मूर्ती, काँग्रेस नेते प्रेमील नाईक, नारायण श्रीमनवार , आकाश जाधव, उत्तम राठोड, दुरपुडे पाटील,सय्यद अनवर,वसंत राठोड, माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेलिवार, प्रीती मुनेश्वर आदी उपस्थित होते