किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

बिलोलीत जादूटोणा,करणी करणाऱ्या भोंदू तौफिक बाबाचा स्टिंग ऑपरेशनद्वारे पर्दाफाश; पोलिसांच्या मदतीने अंनिसने केला भांडाफोड*जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल*

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.7.जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कासराळीच्या दस्तगीर दर्ग्यावरील तौफिक बाबाकडे दैनंदिन स्वरूपाच्या समस्या आणि आजारावरील उपचारासाठी स्थानिक तसेच आसपासचे लोक उपचाराच्या नावाखाली जातात. त्यासाठी भोंदूबाबा 251, 501, 1001 रुपये आलेल्या लोकांकडून घेतो. आपल्या समस्या घेऊन गेलेल्या लोकांना तुम्हांला आजाराची बाधा किंवा समस्या हे जादुटोणा किंवा करणीमुळे निर्माण झाली आहे, असा खोटा समज पसरवत असल्यामुळे गावात लोकांमद्धे भीतीचे वातावरण निर्माण झाले. जवळपासचे लोकं जमा करून अंगात दैवी शक्ती असल्याचा तो भास निर्माण करून ढोंग करत असे.

दरमान, दि.28 जानेवारी रोजी ईरन्ना बोरोड यांचा पाय दुखत असल्यामुळे उपचारासाठी तो तौफिक बाबाकडे गेला.त्यांनी भोंदू बाबाला आपल्या पायाच्या त्रासाबद्दल सांगितले असता तौफिक बाबाने अंगात आल्याचे बनाव करून,“तुमचा त्रास हा दवाखान्यातील नसून रूक्‍मीनबाई बोरोड यांनी तुमच्यावर मंत्राने करणी, जादूटोणा केल्यामुळे तुम्हांला हा त्रास होत असल्याचे सांगितले”.बाबाने रूक्‍मीनबाईचे नाव सांगितल्याने लोक संशयाने बघू लागले.त्यांच्याशी वादावादी-भांडण करू लागले. याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समिती,नांदेडकडे एक तक्रार देण्यात आली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारणी सदस्य सम्राट हटकर,जिल्हा प्रधान सचिव कमलाकर जमदाडे यांनी बिलोलीचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्टिंग ऑपरेशनची योजना आखण्यात आली.त्या योजनेनुसार दि.4 फेब्रुवारी रोजी सापळा रचून ढोंगी तौफिक बाबाचा पर्दाफाश केला आणि जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

या भांडाफोड स्टिंग ऑपरेशन प्रकरणांमध्ये पोलीस उपनिरीक्षक सय्यद एम.झेड,पोलीस उपनिरीक्षक रूपाली कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे जी.बी., भारत फंताडे, कोरनोळे बी.एस. आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग होता.या कामी अंनिसचे बिलोलीचे कार्याध्यक्ष फारुक शेख,बालाजी एलगंद्रे,मोहन जाधव,सायलू कारमोड यांची मोलाची मदत झाली.

433 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.