माता रमाईच्या जयंती निमित्ताने जनवादी महीला संघटनेचे क्रांतिकारी अभिवादन !
नांदेड: अ.भा. जनवादी महिला संघटनेच्या वतीने शहरातील सीटू कार्यालयामध्ये माता रमाईची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
महामानव तथा राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या यशात खूप मोठा ऐतिहासिक वाटा असणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी माता रमाई यांची जयंती शहरातील सीटू कार्यालयात अ.भा.जनवादी महिला संघटनेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करून माता रमाईस क्रांतिकारी अभिवादन करण्यात आले.
७ फेब्रुवारी १८९८ ते २७ मे १९३५ असा अवघ्या ३७ वर्षाचा त्यांचा जीवन प्रवास असून त्या एका महासुर्याची सावली झाल्या आहेत.कोट्यावधींच्या आई झालेल्या माता रमाईच्या मोठ्या त्यागातूनच डॉ.बाबासाहेबांना क्रांतिकारी प्रेरणा मिळाली आहे.माता रमाई म्हणजे समाधानी वृत्ती,मनाचे औदार्य,शुद्ध चारित्र्य ह्यांची मंगल प्रतिमाच होत्या.
अनेक अडचणीचा सामना करीत रमाईने आयुष्यभर पतीच्या सुरक्षिततेची काळजी घेतली आहे.
अशा महान माता रमाईस जयंती निमित्ताने अ.भा.जनवादी महिला संघटनेच्या वतीने एमजीएम कॉलेज समोरील सीटू कार्यालयात क्रांतिकारी अभिवादन करण्यात आले.
यावेळी सीटूच्या जिल्हाध्यक्ष कॉ.उज्वला पडलवार,अ.भा.जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा निमंत्रक कॉ.करवंदा गायकवाड,शहर निमंत्रक कॉ.लता गायकवाड,
आशाताई धोंगडे,स्नेहलता भिसे,वच्छलाबाई ढगे,सुरेखा भालेराव,सीमा भालेराव,यशोमती कशेवार आदींची उपस्थिती होती.