हजारांची लाच मागणाऱ्या मंडळाधिकाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.6.वडीलांच्या नावाची जमीन आपल्या नावावर करून देण्याच्या कारणासाठी तो फेरफार करण्यासाठी 2 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या चांडोळा ता.मुखेड येथील मंडळाधिकाऱ्याविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
दि.4 फेबु्रवारी रोजी एका तक्रारदाराने चांडोळा ता.मुखेड येथील मंडळाधिकारी मारोती किशनराव मेखाले (57) यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाची जमीन कायदेशीररित्या फेरफार करून त्यांच्या नावावर करून देण्यासाठी 2 हजार रुपयांची लाच मागितली.5 फेबु्रवारी रोजी लाच मागणीची पडताळणी झाली तेंव्हा पंचांसमक्ष मंडळाधिकारी मारोती मेखालेने लाच मागितल्याची बाब निष्पन्न झाली.मुळ वाघी येथील रहिवासी आणि सध्या नाथनगर भागात घर असलेल्या मंडळाधिकारी मारोती किशनराव मेखाले विरुध्द विमानतळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक अरविंद हिंगोले हे करीत आहेत.
ही कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ.राहुल खाडे,अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक अरविंद हिंगोले, पोलीस अंमलदार एकनाथ गंगातीर,सचिन गायकवाड, अंकुश गाडेकर, आशा गायकवाड आणि मारोती सोनटक्के यांनी पार पाडली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही माहिती देतांना जनतेला आवाहन केले आहे की,कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी, शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तसेच त्याच्या लाच मागणीचे मोबाईल फोनवर बोलणे असेल,ऑडीओ,व्हिडीओ असेल, एसएमएस असतील तसेच भ्रष्टाचार संबंधाने कांही माहिती असेल तसेच माहिती अधिकारात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती प्राप्त झाली असेल तर याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.त्यासाठी टोल फ्रि क्रमांक 1064(2),कार्यालयाचा फोन क्रमांक 02426-253512 यावर आणि पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांचा मोबाईल क्रमांक 7350197197 सुध्दा माहिती देता येईल तसेच एसीबी विभागाच्या शासकीय संकेतस्थळावर,मोबाईल ऍपवर आणि फेसबुक पेजवर सुध्दा याची माहिती देता येईल जनतेने भ्रष्टाचार रोखण्यासाठी ही माहिती द्यावी असे आवाहन एसीबी विभागाने केले आहे.