गोविंद पाटील जाधव यांची चेअरमन पदी एकमताने बिनविरोध निवड
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.2. जिल्हातील धर्माबाद तालुक्या मधील रोषणगाव येथे झालेल्या सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत गोविंद पाटील जाधव यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सेवा सहकारी सोसायटी ची निवडणुक दिनांक.14 जानेवारी रोजी घेण्यात आली होती.यात गोविंद पाटील यांच्यासह त्र्यंबक माळगे,माधवराव जाधव,रामराव जाधव,नागनाथ माळगे,हांनमंत माळगे,मारोती शिवशट्टे,विठ्ठल शिवशट्टे,महिला संचालक सौ. गोदावरीबाई माळगे,रूक्मीनबाई शिवशट्टे, इतर मागासवर्गीय वैजनाथ शिवशट्टे, अनु जाती केशव देवके या 12 सदस्ययाची निवड करण्यात आली होती.
दि. 14 जानेवारी रोजी साह्यक निबंधक कार्यालयाच्या अधिक्षक श्रीमती कोयलावार,सहायक मुकेश सावळेश्वर व गट सचिव पोतदार यांच्यासह माजी चेअरमन नागोराव पाटील रोषणगावकर,माजी सरपंच माधवराव माळगे,उपसरपंच अशोकराव माळगे,साईनाथ पाटील रोषणगावकर,विश्वनाथ शिवशट्टे,कांतराव माळगे, तंटामुक्ती अध्यक्ष शिवराज भंडगे, माधवराव माळगे,यादवराव जाधव,शिवानंद माळगे,सतीश माळगे,सोमनाथ माळगे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत गोविंद पाटील जाधव यांची बहुमताने सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली.