किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

जुनी पेन्शन योजनेचा प्रश्नन प्राधान्याने सोडवणारच:- आ.विक्रम काळे

देवनी:-मराठवाड्याचे शिक्षक आमदार विक्रम वसंतराव काळे देवणी तालुक्याचा शिक्षक दरबार प्रसंगी बोलत होते. हा शिक्षक दरबार विवेक वर्धनी मा.विद्यालय देवणी येथे पार पाडला.
यावेळी त्यांनी सांगितले की,1नोव्हेंबर 2005 पूर्वीची राज्यातील सर्व शिक्षक बांधवांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून कितीही संघर्ष करावा लागला तरी आपण मागे हटणार नाही वेळप्रसंग पडला तर सत्तेमध्ये राहून सुद्धा सत्तेच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरु अशी ग्वाही आ.विक्रम काळे यांनी दिली. दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असे त्यांनी सांगितले. तसेच वरिष्ठ व निवड श्रेणीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिक्षक बांधवांचे प्रशिक्षण करून अधिक सोपा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर वैद्यकीय बिलाच्या परिपूर्तीसाठी कोरोना या महाभयानक बिमारीचा समावेश केलेला आहे. तसेच राज्यातील शिक्षक बांधवांना वैद्यकीय बिलाच्या पूर्तीसाठी अनेक दिवस वाट पाहावी लागत आहे,त्यासाठी सर्व राज्यातील शिक्षक बांधवांना कॅशलेस मेडिकल योजना लागू करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे असेही सांगितले..
जिल्हास्तरावरचे जे प्रश्न आहेत ते संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा करून ते मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आणि जे राज्यस्तरावरील प्रश्न आहेत त्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे असेही सांगितले.
या दौर्‍यात विविध शाळांना भेटी देत असताना सर्वप्रथम मीरा माध्यमिक विद्यालय जळगाव, जिल्हा परिषद हायस्कूल जवळगा,श्री.शिवाजी विद्यालय बोंबळी, शिवाजी विद्यालय कवठाळा, विवेकानंद विद्यालय चवणहिप्परगा,भोगेश्वर विद्यालय तळेगाव, कुमार स्वामी विद्यालय पंढरपूर, नरसिंह विद्यालय गुरधाळ,माधवराव माडीवाले विद्यालय कोनाळी, आदर्श विद्यालय नेकणाळ, मौलाना आझाद विद्यालय देवणी, माता नर्गिस दत्त विद्यालय देवणी, जिल्हा परिषद हायस्कूल देवणी, योगेश्वरी विद्यालय देवणी,या विविध शाळांना भेटी देऊन त्यांचे प्रश्न जाणून घेवून तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना संवाद साधून ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले..
यावेळी या दौर्यात आ.विक्रम काळे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगरसेवक प्रा.डॉ.अनिल इंगोले,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव मनोज कन्नाडे,अनिल पाटील जवळगेकर,अनिल कांबळे,राजकुमार चव्हाण, उमाकांत होनराव, ई. होते..
हा शिक्षक दरबार यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संतोष शेंडगे, तालुका सचिव भरत देवणीकर, प्राचार्य वाघंबर कांबळे,युनुस आतनुरकर,सुधीर साबने, सतीश दोडके,व राष्ट्रवादी शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले…

358 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.