अखेर दि.16 जानेवारी रोजी किनवट पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून अभिमन्यू साळुंके हे रुजू
किनवट/प्रतिनिधी
पोलीस निरीक्षक मारुती थोरात यांची पदोन्नतीने बदली झाल्याने 9 डिसेंबर पासून किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पद रिक्त होते. या रिक्तपदी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वाठोरे यांनी प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून उत्कृष्ट रित्या काम पाहात होते. अखेर दि.16 जानेवारी रोजी किनवट पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक म्हणूनअभिमन्यू साळुंके हे रुजू झाले आहेत.
पोलीस निरीक्षक मारुती थोरात यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर पोलिस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण विभागात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंके यांची किनवट येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
किनवट पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध मटका, जुगार, गुटखाविक्री तसेच अवैध दारू विक्रीच्या धंद्याने ने उच्छाद मांडला आहे. याबरोबरच गुन्हेगारी च्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे यांनी अवैद्य धंदे विरोधात धाडसत्र राबविण्यास सुरुवात केल्यामुळे अवैध धंदेवाल्यांची धाबे दणाणले आहे.नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंके यांच्यापुढे यांच्या पुढे हीअवैध धंदेवाल्यांचे मोठे आव्हान असून ते कशा प्रकारे हाताळतात याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून आहे.