प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने सावित्रीच्या लेकींचा सन्मान। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त केले होते आयोजन
*जिल्हा प्रतिनिधी : संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*: प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जिल्हा नांदेडच्या वतीने भारताच्या प्रथम शिक्षिका ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीच्या लेकीचं सन्मान करण्यात आला.
हा सन्मान प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य महिला संपर्क प्रमुख विजयाताई काचावार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. ग्रामीण पोलीस ठाणे, नांदेड येथे सावित्राबाई फुले यांच्या जयंतीनिमित्य महिला पोलीस कर्मचाऱ्यांना पोळीचे डब्बे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष मा. संजीवकुमार गायकवाड, जिल्हा सरचिटणीस मा. हर्जिंदर सिंघ संधू, सचिव गोविंद तोरणे पाटील, नांदेड शहर अध्यक्ष शिवराज कांबळे,उपाध्यक्ष कामाजी अटकोरे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.महिला पोलीस कर्मचारी संयोगिता तुकडोजी आटवले, मनीषा प्रभाकरराव वंजे,वैशाली बापूराव गोंशेटवाड,अनिता बालाजी वाडीकर, पूनम रमेशराव उदगीरे, अस्विनी माधवराव मस्के, दगडगावच्या सामाजिक कार्यकर्त्या राणी मधुकर ससाणे, वाघीच्या दूध उत्पादक सरस्वती राजू काठारे, करोना योद्धा लायन्स नेत्रालय नांदेडच्या सुजिता सुरेश भोकरे, यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला आहे.