किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त* *घुंगराळा येथे भाजीपाला, फळबाग लागवड व उत्पादन वाढ शेतकरी चर्चासत्र व मार्गदर्शन शिबीर संपन्न

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.30. जिल्यातील नायगाव तालुक्या मधील घुंगराळा शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने व्यावसायिक दृष्टीने शेती करावी,देशातील शेतकऱ्यांसाठी शरद पवार साहेबांचे मोठे योगदान आहे, त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना अंमलात आणल्या, शेतकरी अडचणीत असला तर त्यांना पाठबळ दिले,असे मत शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी व्यक्त केले..
या वेळी ते म्हणाले की वसंत सुगावेंना गेली १५ वर्ष झालं मी ओळखत असून,सुगावे हे एक जनतेची कामे करणारा, सर्वपक्षीय हितसंबंध जपणारा, सर्व मंत्री महोदयांशी सलोख्याचे संबंध असणारा,तसेच ग्रामीण स्तरावरील कामे थेट मंत्रालयात मार्गी लावून गावचा तसेच आजूबाजूच्या खेड्यातील विकासकामे मार्गी लावणारा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे..ह्या निष्ठावाण कार्यकर्त्याला भविष्य काळात जनतेने लोकांची कामे करणारा प्रतिनिधी,आपला अडीअडचणी सोडवणारा प्रतिनिधी म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून वरच्या स्तरावर पाठवावा,अशी भावना त्यांनी घुंगराळा येथील शेतकरी चर्चासत्र व मार्गदर्शन शिबिर या कार्यक्रमात व्यक्त केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील,कृषिरत्न हायटेक नर्सरी चे संचालक शितल पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत सुगावे यांनी केले. या वेळी सुगावे म्हणाले की, शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे..शेतकरी जगला पाहिजे,आपल्या तालुक्यातील शेतकरी सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रमाने आर्थिक बाबतीत पुढे गेला पाहिजे,त्यांनी कमी कालावधीत,कमी जमिनीत, कमी पाण्याचा वापर करून, लागवडीची आधुनिक पद्धत व त्यातून उत्पादन वाढ करून आपल्या शेतकऱ्यांना आपली आर्थिक प्रगती कशी साधता येईल,ह्या संबंधी माझ्या तालुक्यातील मायबाप शेतकऱ्यांसाठी हे शेतकरी चर्चासत्र आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.त्याचप्रमाणे अधिकाधिक उत्पन्न काढण्याची तालुक्यातील व परिसरातील मायबाप शेतकऱ्यांनी सोयाबीन , कापूस,तूर,मूग,उडीद ह्या पारंपरिक पिकांसमवेत भाजीपाला,व फळे लागवड तसेच कमी खर्चात अधिकाधिक उत्पन्न काढण्याची पिके घ्यावी, असेही ते म्हणाले..त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात अशीच शेतकरी उपयोगी,लोकहितयोगी कार्यक्रम माझ्या मायबाप जनते साठी राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डी. बी.जांभरूनकर,बिलोली येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाषराव गायकवाड, उमरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग देशमुख गोरठेकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर, नन्हेम्स इंडिया प्रा. लि.या कंपनीचे विष्णू घोडके,राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष दगडगावकर,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरमकर,राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता सेलचे शहराध्यक्ष एकनाथ वाघमारे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धर्माबाद तालुकाध्यक्ष हणमंत पा. जगदंबे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उमरी तालुकाध्यक्ष अनसाजी पा.जिगळेकर,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे धर्माबाद तालुकाध्यक्ष नागेंद्र पा.चोळाखेकर,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाउपाध्यक्ष ऍड. सुधीर येलमे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नायगाव तालुका कार्याध्यक्ष विश्वानाथ बडूरे,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नायगाव तालुकाध्यक्ष अमोल सातेगावकर,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नायगाव तालुकाध्यक्ष व्यंकट शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग नायगाव तालुकाध्यक्ष केरबा रावते यांची प्रमुख उपस्थिती होती.

या शेतकरी मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक नन्हेम्स इंडिया कंपनीचे विष्णू घोडके यांनी शेतकऱ्यांना भाजीपाला,फळे या पिकांच्या लागवडीबद्द विस्तृत पणे माहिती दिली.यामध्ये लागवड कशी करायची, उत्पादन कसे वाढवायाचे ,बाजारात विक्री करणे यासंदर्भात वेगवेगळ्या भाजी,फळे याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.तसेच पारंपारिक शेतीबरोबर फळ,भाजीपाला शेती काशी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल व शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल याबद्दल मार्गदर्शन केले.शेती करताना आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठी कोणत्या हंगामात पिके घ्यावी याबाबतही मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास नायगाव तालुक्यातील हजारो शेतकरी उपस्थित होते.

या कार्यक्रमास नायगाव तालुक्यातील तसेच बरबडा गटातील सर्व शेतकरी बांधव तसेच राजकीय, सामाजिक, तसेच सर्व वंजारवाडी,सावरखेड, आंतरगाव,इज्जतगाव, वजीरगाव,टाकळी, रुई,पाटोदा, निळेगव्हान,हिप्परगा, सुगाव, गंगणबीड,कुष्णुर,कहाळा, बरबडा,पळसगाव,टाकळगाव, सातेगाव,सांगवी,कुंटुर तांडा, गावचे उपस्थित राहिलेले सर्व सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य ,सेवा सहकारी सोसायटी चेअरमन,सेवा सहकारी सोसायटी सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष,पोलीस पाटील, प्रगतशील शेतकरी यांच्यासह तालुक्यातील सर्व आजी माजी सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते..या वेळी शेतकऱ्यांसाठी हा अतुलनीय कार्यक्रम ठेवून उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे शेतकरी बांधव व उपस्थितांनी सुगावे यांचे कोतुक केले.

या वेळी ग्रामविस्तार अधिकारी दंडेवाड साहेब,ग्रामविस्तार अधिकारी मातावाड साहेब, संभाजीराव तुरटवाड, ग्रामपंचायत सदस्य गोविंद पांचाळ, से.स.सो.चेअरमन नारायण पा. ढगे,शंकरराव यलपलवाड, मा. ग्रामपंचायत सदस्य बालाजीराव हाळदेवाड, गंगाधरराव बोधनकर,शिवाजी पा.ढगे,ग्रामपंचायत सदस्य गोविंद पांचाळ, मा. ग्रामपंचायत सदस्य श्यामराव यमलवाड, विठ्ठलराव बाष्टे,गोविंदराव पा. शिंदे,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष माधव पा. ढगे, मा. ग्रामपंचायत सदस्य मुरहरी तुरटवाड, मा. ग्रामपंचायत सदस्य गंगाधर पा. ढगे, माधव जलदेवार, दशरथ पा. सुगावे, महेश पा.ढगे, राम पा. सुगावे, विलास पा. ढगे, राजेश पा.ढगे, सखाराम पा. सुगावे,योगेश पा. ढगे,साहेबराव पा. ढगे,रोहिदास पा.ढगे,उमेश पा. कदम आदी उपस्थित होते..
सदर कार्यक्रमाचे आभार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्त सेलचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक एकनाथ वाघमारे यांनी केले.

121 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.