किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

आमदार भिमराव केराम यांच्या माहूर तालूक्यात जनसंपर्क दौऱ्याचे आयोजन.

किनवट(प्रतिनिधी) किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांना कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामूळे गेल्या दिड वर्षाच्या कालावधीत मतदार संघातील जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी दौरा करणे शक्य झाले नाही परंतू कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्याने आमदार केराम हे दिनांक 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2021या कालावधीत माहूर तालुक्यातील प्रत्येक गावाला भेट देऊन नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या प्राधान्याने सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून या दौऱ्यादरम्यान दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11वाजता वानोळा,दूपारी 4वाजता कूपटी 11नोव्हेंबर11वाजता ईवळेश्वर,4 वाजता वजराशेख फरीद13 नोव्हेंबर रोजी 11वाजता पालाईगूडा, 4 वाजता मलकागूडडा, 16 नोव्हेंबर 11वाजता करंजी 4वाजता अंजनखेड 17 नोव्हेंबर 11वाजता वाई बाजार 4वाजताआष्टा सायंकाळी 7वाजता लखमापूर ईत्यादी ठिकाणी जनता दरबार आयोजित केले असून यावेळी तालुक्यातील सर्व अधिकारी हजर राहणार आहेत जनतेच्या अडीअडचणी व तक्रारी जाणून घेऊन जागेवरच निपटारा करणार आहेत, तसेच आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन देखील संपन्न होणार असल्याची माहिती आमदार केराम यांचे स्वीय सहाय्यक प्रकाश कूडमते यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली असून मतदार संघातील जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

237 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.