किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

राष्ट्रनिर्मात्यांच्या जीवनावर तामगाडगे गुरूजींनी ‘क्रांतीसूर्य’ व ‘रमा’ ही नाटकं लिहिण्याचं धाडस यशस्वीपणे केलं -ज्येष्ठ समिक्षक प्रा. डॉ. प्रकाश मोगले

किनवट /प्रतिनिधी: तामगाडगे गुरुजींच्या रंगभूमी क्षेत्रातील कामगिरीची दखल घेतल्याशिवाय किनवटचा सांस्कृतिक इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. नाट्यलेखनाने समाजातील प्रश्न सुटायला मदत झाली पाहिजे, यासाठी त्यांनी आयुष्यभर लेखणी झीजवली. त्यांच्या लिखाणाचा हेतू समाजप्रबोधन आहे. भाषण प्रवचनापेक्षा नाट्य प्रयोगातून दिला जाणारा बुद्धांचा धम्मविषयक विचार अधिक खोलवर प्रेक्षकांच्या मनात रुजणारा आहे. महात्मा फुले-सावित्रीबाई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर- रमाई यांच्या त्यागावर राष्ट्राची उभारणी झालेली आहे. याच खऱ्या राष्ट्रनिर्मात्यांच्या जीवनावर तामगाडगे गुरूजींनी ‘क्रांतीसूर्य’ व ‘रमा’ ही नाटकं लिहिण्याचं धाडस यशस्वीपणे केलं आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ समिक्षक प्रा. डॉ. प्रकाश मोगले यांनी केले.
येथून जवळच असलेल्या गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या मातोश्री कमलताई ठमके सभागृहात आयोजित यादव तामगाडगे गुरुजी लिखित “क्रांतीसूर्य” व ” रमा” या नाट्यग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके अध्यक्षस्थानी होते. कौशल्य प्रकाशनचे प्रकाशक डॉ. अशोक गायकवाड, ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. प्रकाश मोगले , समाज व माध्यम क्षेत्राचे अभ्यासक प्रा.डॉ. राजेंद्र गोणारकर, रामजी कांबळे, प्राचार्या शुभांगीताई ठमके हे प्रमुख अतिथी , नाटककार यादव तामगाडगे गुरुजी व त्यांच्या पत्नी शांताबाई तामगाडगे मंचावर उपस्थित होते.
राजा तामगाडगे यांनी प्रास्ताविक केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. रमेश मुनेश्वर यांनी आभार मानले. प्रारंभी वामनदादा कर्डक संगीत अकादमीच्या वतीने सुरेश पाटील , प्रज्ञाचक्षू संगीतकार अनिल उमरे, आम्रपाली वाठोरे , रुपेश मुनेश्वर यांनी व्यंकट मुंडावरे (तबला) व साहेबराव वाढवे (ढोलकी ) यांच्या साथीने गीते प्रबोधनाची सादर केली.
यादव तामगाडगे गुरुजी लिखित ” क्रांतीसूर्य” व ” रमा” या नाट्यग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाल्यानंतर संपादक साजिद बडगुजर यांच्या सा. लोकादेशच्या प्रकाशन सोहळा विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले विचार मंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके म्हणाल्या की, साहित्याची समाजाला गरज आहे. आदिकाळापासूनचं साहित्य नसतं तर आम्ही घडलो नसतो. नाटक हे ऑडिओ व्हिज्युएल माध्यम आहे. ते प्रभावीपणे माणसाच्या मनात घर करतं. तामगाडगे गुरूजींची ‘क्रांतीसूर्य व रमा ही नाटकं समाज प्रबोधनाचं उत्तम साधन आहेत.
यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे संस्कृती व माध्यम अभ्यासक प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर म्हणाले,तामगाडगे गुरुजी किनवटच्या दुर्गम क्षेत्रात गेली चार दशकं नाटकं सादर करतात. ही अत्यंत समाधानाची बाब आहे. साहित्य क्रांती करते का ? तर नाही. साहित्य क्रांती करण्याची मानसिकता तयार करतं. अशाच प्रकारे अदिवासी दुर्गम भागातील दुःख जगासमोर मांडणाऱ्या यादव तामगाडगे गुरुजी यांची नाट्यसंहिता आज पुस्तक रुपानं साकारली आहे. ही अत्यंत चांगली बाब आहे. तामगाडगे गुरूजींची ‘क्रांतीसूर्य ‘ व ‘रमा’ ही नाटकं क्रांति घडविणाऱ्या महासूर्य महानायकांच्या जीवन कार्याला प्रभावीपणे सचित्र मांडणारी प्रभावी साधनं आहेत.
या औचित्याने नाट्यप्रयोगात प्रमुख भूमिका साकारलेल्या डॉ. विजय कांबळे, कचरू चौधरी, रमेश मुनेश्वर , शब्दांजली कानिंदे- शिंदे, रूपेश मुनेश्वर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रा. रामप्रसाद तौर , संपादक नंदकुमार कांबळे, काशीनाथ भवरे, शंकर भातनासे, रमेश चौधरी, सखाराम घुले, प्रा. गजानन सोनोने, ऍड. मिलिंद सर्पे, उद्धव रामतिर्थकर , प्रभाकर बोड्डेवार, सुमनताई साबळे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. पंजाब शेरे, महेंद्र नरवाडे, अनित्य कांबळे, शंकर तामगाडगे, माया तामगाडगे- कांबळे, राजा तामगाडगे, राहूल तामगाडगे, कपिल भवरे, आनंद गिमेकर , आशा तामगाडगे , पुण्यरथा उमरे- तामगाडगे, भीमज्योत मुनेश्वर , शीलरत्न पाटील आदिंनी परिश्रम घेतले.

603 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.