शेतकऱ्यांच्या व जनतेच्या विरोधातील भाजप सरकारला सत्तेतून हाकला! प्रवीण अण्णा जेठेवाड
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.9.भाजप ने शेतकऱ्यांना संपवण्यासाठी 3 काळे कृषी कायदे आणले होते. ह्या विरुद्ध देशातील शेतकरी संघटना एक होऊन हे कायदे रद्द करण्यास भाग पाडले. ह्या आंदोलन मध्ये 1000 शेतकरी हुतात्मा झाले. आज भाजप ची सत्ता केंद्रातून हटवणे आवश्यक आहे. अबकी बार किसान सरकार हे घोषवाक्य के. सी.आर. साहेबांनी दिलेले आहे.
हे घोषवाक्य सिद्ध करण्यासाठी त्यांनी तेलंगणा राष्ट्र समिती हा त्यांचा पक्ष भारत राष्ट्र समिती मध्ये रूपांतरित करून केंद्रीय राजकारणात प्रवेश केलेला आहे. तेलंगणा राज्याने राज्य निर्मिती झाल्यापासून मागील नऊ वर्षात जी विकास कामे कृषी क्षेत्रात व इतर क्षेत्रात केलेली आहे त्याचबरोबर सिंचन क्षेत्रामध्ये लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट यांनी केलेले आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती महाराष्ट्रातील बुद्धिजीवी जनतेने व राज्यकर्त्यांनी व पत्रकार बांधवांनी घ्यावी. याचे खुले आव्हान त्यांनी केलेले आहे. एका राज्यकर्त्यांनी केलेले खुले आव्हान हे मस्करी करण्याचे नसून ते आव्हान पेलण्यासाठी आहे.
महाराष्ट्रात एखाद्या कुस्तीगिराने, दुसऱ्या कुस्तीगीराला मैदानामध्ये कुस्तीसाठी आव्हान केलं तर दुसऱ्या कुस्तीगीराला त्याच्या विरोधात कुस्ती लढवावी लागते.
त्याच पद्धतीने एका राज्यकर्त्याने महाराष्ट्रातील सर्व राज्यकर्त्यांना व देशातील सर्व राज्यकर्त्यांना खुले आव्हान केलेले आहे की, मी ज्या पद्धतीने माझ्या राज्याचा विकास केला त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या राज्याचा विकास करून दाखवा तेव्हाच माझ्याविरुद्ध बोला.
महाराष्ट्रातील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप,शिवसेना पक्षाच्या सर्व नेत्यांनी महाराष्ट्राला भकास राज्य करून टाकले आहे. राजकीय षड्यंत्रातून महाराष्ट्रातील सत्ता मिळवण्यासाठी षडयंत्र रचल्या गेले आहे.
ज्या पद्धतीने जनावरांची खरेदी होते त्या पद्धतीने आमदारांची खरेदी करून स्वतः साठी सत्ता प्राप्त केलेली आहे. अशा अवस्थेमध्ये जनता त्रस्त आहे,या जनतेला राजकारणाच्या बेड्यातून मुक्त करण्यासाठी भारत राष्ट्र समिती पक्षाची स्थापना झालेली आहे. राज्याला जे भकास स्वरूप आणलेला आहे ते जर नष्ट करायचा असेल तर भारत राष्ट्र समिती या पक्षाला सत्ता देण्यावाचून पर्याय नाही.
मी अनेक वेळा के.चंद्रशेखर राव यांना प्रत्यक्ष भेटलो.भेटीदरम्यान चार चार -पाच पाच तास त्यांच्या सोबत जेव्हा चर्चा केली. तेव्हा त्यांच्या तोंडून एकच वाक्य निघाल. महाराष्ट्रातील जो शेतकरी आत्महत्या करत आहेत त्यांना वाचवण्याची इच्छा महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना का होत नाही.शेतकरी जेव्हा आत्महत्या करतात तेव्हा महाराष्ट्रातील राज्यकर्ते झोपतात कसे? त्यांना झोप कशी येते? त्यांना दुःख का होत नाही? त्यांचे मन का रडत नाही? महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत आहे.तो रोखण्यासाठी महाराष्ट्रातील नवतरुण व शेतकरी बांधव पुढे येऊन नवीन सरकार का तयार करत नाही.महाराष्ट्रात काहीतरी गडबड आहे.ही गडबड जर दूर करायची असेल तर शेतकऱ्यांच्या लेकरांना सत्ता च्या मुख्य स्थानी येणे आवश्यक आहे.राजकारण शिकून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मी तुम्हाला साथ देणार तुम्ही लढाईसाठी सज्ज व्हा…
महाराष्ट्रातील जनतेने अबकी बार किसान सरकार हे घोषवाक्य लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.आज प्रत्येक पिकाचे उत्पादन करत असलेले शेतकरी बांधव परेशान आहेत.कांद्याला भाव हे सरकार देऊ शकले नाही. तर ते शेतकऱ्यांची प्रगती करू शकतात का ?
महाराष्ट्राचे सर्व राजकीय व्यक्ती हे राजकीय कंत्राटदार झालेले आहेत. या 40% मलाई खाणाऱ्या भाजप च्या कंत्राटदारापासून महाराष्ट्राला वाचवणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र जर वाचवायचा असेल तर शेतकऱ्यांचं सरकार आणणं आवश्यक आहे. महाराष्ट्रातील बुद्धिजीवी शेतकऱ्यांच्या नेत्यांनी के. चंद्रशेखर राव यांची भेट घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि भारत राष्ट्र समिती पक्षाला मजबूत करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील पत्रकारांनी के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात केलेल्या तीन सभा मधील भाषणाची संपूर्णपणे माहिती घ्यावी.राजकीय स्वरूपाचे षडयंत्र न रचता त्यांचा एजेंडा महाराष्ट्राच्या प्रगतीचा आहे. के.सी.आर साहेब हे देवदूत म्हणून महाराष्ट्रात अवतरले आहेत.
त्यामुळे अशा महान नेत्याची मदत घेऊन महाराष्ट्रात भारत राष्ट्र समितीची सत्ता स्थापन करणे आवश्यक आहे.ही सत्ता शेतकऱ्यांच्या विकासासाठी असेल,महाराष्ट्रामध्ये जलसिंचनाचा जो घोटाळा झाला तो घोटाळा तेलंगणा राज्यांमध्ये झाला का? तर याचे उत्तर नाही आहे.
तेलंगणा राज्य एक लाख करोड रुपये सिंचनावर खर्च करते आणि प्रत्येक तालुक्यामध्ये लिफ्ट इरिगेशनने पाणी नेते आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवते ही योजना मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये आजपर्यंत का राबवल्या गेली नाही.
विदर्भाच्या बाजूला असलेल्या आदिलाबाद जिल्ह्यातील चेंनुर विधानसभा मतदारसंघांमध्ये पाण्याची प्रोजेक्ट कशी आहेत. याबद्दलचा अभ्यास महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी घेणे आवश्यक आहे.आणि हे प्रोजेक्ट गडचिरोली,चंद्रपूर,भंडारा, गोंदिया जिल्ह्यात का राबवल्या गेले नाही.याची उत्तर महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी दिले पाहिजे.
महाराष्ट्र नव्या क्रांतीला आता सामोरे जाणार आहे. जवळपास दिड कोटी महाराष्ट्रातील जनता भारत राष्ट्र समिती हा पक्ष मध्ये प्रवेश करणार आहे. नवीन क्रांती घडवण्यासाठी सज्ज व्हा तरुणांनो.शेतकऱ्यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात सामील व्हा.
असे आव्हान प्रवीण अण्णा जेठेवाड भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.