वंचित बहुजन आघाडी चे विविध मागण्यासाठी हिमायतनगर तहसील कार्यालय समोर एकदिवसीय धरणे आंदोलन.*
हिमायतनगर प्रतिनिधी(राजु गायकवाड.)
मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने आवाज उठवत आहे 5 जुलै 2021रोजी विधान भवनावर मोर्चा काढून न्यायालयीन मान्यता दिलेल्या पाच टक्के मुस्लिम शैक्षणिक आरक्षण तातडीने अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हिमायतनगर च्या वतीने आंदोलन महाराष्ट्र वफफ बोर्डाच्या मिळकतीमध्ये वाढ करून इमाम मोआज्जिनखुदाम हजरत यांना मासिक वेतन सुरू करावे, संत विचाराचे प्रचार प्रसार करणाऱ्या ह.भ.प.किर्तनकार यांना शासनाकडून मासिक वेतन चालू करावे,सारथी,बार्टी महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्य समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी वरील सर्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हिमायतनगर तालुक्याच्या वतीने २२ नोव्हेंबर रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले