किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी* *पत्रकारांना टोल ‘फ्री’ करण्यासाठी लातूर जिल्हा कार्यकारिणीचे निवेदन

लातूर – प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य शाखा लातूर जिल्ह्याच्या वतीने नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोल फ्री करावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.
नितीनजी गडकरी हे लातूरमध्ये विविध विकास कामाच्या उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित होते. यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांच्या निवासस्थानी भेट घेऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य लातूर जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोल फ्री करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून वार्तांकनाचे अहोरात्र काम करीत आहे. एवढेच नाही तर रात्री, बेरात्री वार्तांकनासाठी सातत्याने प्रवास करावा लागत आहे म्हणून पत्रकारांना टोल फ्री केल्यास वार्तांकन करण्याची गती अधिक वाढणार असल्याने नितीनजी गडकरी यांनी पत्रकारांना टोल फ्री करून व तसे आदेशीत करावे.
यावर निश्चितच विचार केला जाईल असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळास दिले. महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोल फ्री करण्यात येण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांनी नितिन गडकरी यांना स्मरणपत्र देण्यात यावे जेणे करुन ते लवकरात लवकर आमलात येईल असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी संघटनेचे पदाधिकारी व पत्रकारांना आवाहन केले आहे. या निवेदनावर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहूकुमार शिंदे, राज्य उपाध्यक्ष व्यंकट पन्हाळे, राज्य उपाध्यक्ष अजय सुर्यवंशी, राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, संपर्क प्रमुख नितीन भाले, संघटक संजय राजूळे, लातूर जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील तसेच जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संतोष सोनवणे, युवक अध्यक्ष सुनील कांबळे, रवी बिजलवाड आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

489 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.