किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

विहाराच्या विकासासाठी सहकार्य करु -महापौर जयश्रीताई पावडे;माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन व वाचन कट्‌ट्याचे उद्घाटन संपन्न

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

*नांदेड*:दि.20.शहरातील सहयोगनगर येथील माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार परिसराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहु असे आश्वासन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ.जयश्रीताई निलेश पावडे यांनी शनिवारी सकाळी आयोजित बुद्धविहाराच्या संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी दिले.

नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे माजी सभापती तथा प्रभागाचे नगरसेवक फारुख अलि खान यांच्या निधीतून सहयोग नगर येथील बुद्ध विहाराच्या संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन व मनपाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या वाचन कट्‌ट्याचे उद्घाटन महापौर सौ. जयश्रीताई पावडे यांच्या हस्ते करण्यात आले.सर्व प्रथम पूजनीय भिखू शिलरत्न व पूजनीय भिखू कमलधम्मो यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची पूजा करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.सर्व प्रमुख पाहुण्यांचे शाल आणि पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाग पाचचे नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी सभापती फारुख अली खान,प्रफुल्लदादा सावंत, नगरसेवक प्रतिनिधी सुभाष रायबोले,नगरसेविका अर्पणाताई नेरलकर,नगरसेवक महेंद्र पिंपळे,नगरसेवक संजय पांपटवार,नगरसेवक दयानंद वाघमारे,नगरसेवक प्रतिनिधी सुरेशभाऊ हाटकर, नगरसेवक प्रतिनिधी ऍड.धम्मपाल कदम, नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष पत्रकार पंढरीनाथ बोकारे,माजी नगरसेविका कृष्णाताई मंगनाळे, इंजि.संदीप पाटील, मनपाचे ग्रंथपाल संजय कार्ले,सुभाष काटकांबळे,शेख फारुख, खाजामिया,जयाताई सूर्यवंशी, पुष्पाताई भरणे,राजेश बिर्‍हाडे, साहेबराव गायकवाड,ईश्वर सावंत,साहेबराव पुंडगे,प्रकाश लांडगे,चैतन भुजबळ,जनार्दन जमदाडे,हंसराज काटकांबळे, आदींसह परिसरातील नगारिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश कोकरे यांनी करुन शेवटी आभार मानले.अन्नदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

56 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.