12 नोव्हेंबर रोजी व्यासपीठावर भडकावू भाषण करणाऱ्या प्रत्येकाला अटक होणार-संजयकुमार* *अपर पोलीस महासंचालकांकडून नांदेड पोलीसांचे कौतुक
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:12 नोव्हेंबर रोजी व्यासपीठावर भडकावू भाषण करणाऱ्या प्रत्येक माणसाला अटक केली जाणार आहे.नांदेड पोलीसांनी तो जमाव इतर वस्तीकडे वळु दिला नाही, स्वत:च्या अंगावर घेतला याचे मी कौतुक करतो.समाजात अशांतता माजवणाऱ्या प्रत्येक माणसावर कठोर कायदेशीर कार्यवाही केली जाणारच असे अपर पोलीस महासंचालक संजयकुमार यांनी सांगितले.
12 नोव्हेंबर रोजी नांदेड शहरात घडलेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर आज 16 नोव्हेंबर रोजी त्या घटनेच्याविरोधात मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने आपल्या अनुभवाचे मार्गदर्शन नांदेड जिल्हा पोलीस दलाला करण्यासाठी मी नांदेडला आलो होतो असे संजयकुमार म्हणाले. पोलीस अधिक्षक कार्यालयात संजयकुमार पत्रकारांशी बोलत होते.या प्रसंगी पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी,पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर हे उपस्थित होते.
12 नोव्हंेंबरच्या निषेध सभेला सुध्दा परवानगी नव्हती. पोलीस विभागाने ती परवानगी नाकारली होती.त्यानंतर सुध्दा हा कार्यक्रम झाला आणि तो कार्यक्रम हिंसाचाराकडे वळला.माझ्या नांदेड जिल्ह्यातील पोलीसांनी तो हिंसक झालेला जमाव इतर धर्मिय वस्तीकडे वळू दिला नाही. त्या जमावाला तेथेच रोखून ठेवले. त्याचे स्वरुप जातीय हिंसाचारात बदलू दिले नाही.
यासाठी मी नांदेड जिल्हा पोलीस दलाचे कौतुक करतो आहे असे सांगितले.आजपर्यंत 50 जणांना अटक झाली आहे.पोलीस प्राथमिकी प्रमाणे 83 जणांची नावे या दिवशीच्या गुन्ह्यांमध्ये लिहिलेली आहेत.जी माणसे अद्याप अटक झाली नाहीत. त्यांना मी अत्यंत कडक शब्दात 48 तासाच्या आत अटक करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
त्यासाठी शहर उपविभाग, इतवारा उपविभाग आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या विविध पथकांच्या मार्फत ही अटक कार्यवाही पुर्ण होणार आहे असे संजयकुमार म्हणाले.
12 नोव्हेंबर रोजी घडलेला प्रकार पोलीसविरुध्द जमाव असा घडला.त्यात पोलीसांनी घेतलेली मेहनत प्रशंसनिय आहे. मी नांदेड येथे कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यासाठी आलो नाही तर माझ्या अनुभवांचा फायदा मी जिल्हा पोलीस दलाला देण्यासाठी येथे आलो आहे.असे संजयकुमार म्हणाले. कोणत्याही कार्यवाहीमध्ये आमचा विजय झाला असेल,त्यात आम्हाला पिछेहाट झाली असेल तरीपण आम्ही अर्थात पोलीस दल स्वत:चे आत्मपरिक्षण करतो त्यात काय शिल्लक राहिले,काय करायला पाहिजे होते, काय केले आहे अशा सर्व विषयांवर उहापोह करून पुढील घटनांसाठी आम्ही सदैव तत्पर असतो.एका पत्रकाराने राजकीय फायद्यासाठी हा प्रकार घडवला काय असे विचारले असता संजयकुमार म्हणाले राजकीय फायदा कोण कसा घेणार हे लिहिणे पत्रकारांचे काम आहे. मी आणि पोलीस दल नेहमीच घडलेल्या घटनेबद्दल विचार करतो आणि त्यात समाजाची शांतता कशी प्रस्तापित करता येईल या शिवाय आमचा दुसरा विचार कधीच नसतो असे सांगितले.
दंगा घडविण्याचा उद्देश काय आहे असा प्रश्न विचारल्यावर संजयकुमार म्हणाले दंग्याचा उद्देश माझ्या अनुभवाप्रमाणे फक्त लुटपाट करणे आणि तोडफोड करणे एवढाच असतो.यापेक्षा दंग्यात दुसरा कांहीच उद्देश नसतो.